
आम्ही शेवटच्या काही मिनिटांमध्ये तयारीच्या काही उत्कृष्ट टिप्स तुमच्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. ज्यामुळे उमेदवारांना आयबीपीएस लिपीक २०२० प्रिलिम्स परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी मदत होईल.
IBPS Clerk Prelims 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) आयबीपीएस लिपिक पूर्वपरीक्षा 2020 12 आणि 13 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सीआरपी (CRP) लिपिक भरतीअंतर्गत आयबीपीएस लिपिक २०२० साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी ऑनलाइन पूर्व परीक्षेस हजेरी लावावी लागेल. यावर्षी आयबीपीएसने लिपिकांच्या एकूण 2557 रिक्त जागा भरण्याचे जाहीर केले आहे. स्पर्धेची पातळी लक्षात घेता, उमेदवारांना चांगल्या गुणांसह परीक्षेस पात्र होणे थोडे अवघड आहे. पण आम्ही शेवटच्या काही मिनिटांमध्ये तयारीच्या काही उत्कृष्ट टिप्स तुमच्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. ज्यामुळे उमेदवारांना आयबीपीएस लिपीक २०२० प्रिलिम्स परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी मदत होईल.
- जपान आणि संधी : ओरिगामी आणि भूमिती
परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर काय करायचे?
आयबीपीएस लिपिक पूर्वपरीक्षेत इंग्रजी भाषा (३० बहुपर्यायी प्रश्न - एमसीक्यू), रीझनिंग अॅबिलिटी (३५) आणि न्यूमरिकल अॅबिलिटी (३५) असे मिळून उमेदवारांना एकूण १०० मल्टीपल चॉइस प्रश्न (एमसीक्यू) विचारले जातील. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कमी होतील. त्यासाठी खाली दिलेल्या टिप्स पाहा आणि त्यानुसार आयबीपीएस लिपिक परीक्षेत सुधारणा करा :
आयबीपीएस लिपिक पूर्वपरीक्षा नमुना 2020
विभाग | प्रश्नांची संख्या | जास्तीत जास्त गुण | वेळ |
इंग्रजी भाषा | 30 | 30 | 20 मिनिटे |
रीझनिंग अॅबिलिटी | 35 | 35 | 20 मिनिटे |
न्यूमरिकल अॅबिलिटी | 35 | 35 | 20 मिनिटे |
एकूण | 100 | 100 | 1 तास |
- पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह मल्टीपल चॉईस (एमसीक्यू) स्वरूपात आणि ऑनलाइन घेण्यात येईल.
- हिंदी भाषा माध्यम असणाऱ्या उमेदवारांसाठी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल.
- प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ आहे आणि उमेदवारांना प्रत्येक विभागात पात्र ठरणे आवश्यक आहे.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण किंवा 0.25 गुण कमी होतील.
IBPS पूर्व परीक्षेला जाण्याआधी इंग्रजी भाषा, रिझनिंग अॅबिलिटी आणि न्यूमरिकल अॅबिलिटी या महत्त्वाच्या विषयांची उजळणी करण्याची ही योग्य वेळ आहे.
वेळेचं व्यवस्थापन आणि अचूकता
आयबीपीएस सारख्या स्पर्धात्मक परीक्षा क्रॅक करण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन आणि अचूकता आवश्यक आहे. ज्यांनी परीक्षेसाठी चांगला सराव केला आहे, त्यांना दिलेल्या वेळेत अचूकतेने पेपर सोडविता येईल. पेपर सोडवताना उमेदवारांनी विशिष्ट प्रश्नांसाठी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नये. पेपर पूर्ण करायचा मंत्र - अवघड वाटणारे प्रश्न सोडून पुढे जाणे.
प्रवेश पत्र (अॅडमिट कार्ड), फोटो आणि ओळखपत्र कधीच विसरू नका
आयबीपीएस लिपिक पूर्वपरीक्षा प्रवेश पत्र (अॅडमिट कार्ड), फोटो आणि ओळखपत्र (आयडी) ही कागदपत्रे परीक्षा केंद्रावर घेऊन जा. यापैकी एकही विसरू नका, नाहीतर तुम्हाला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. अॅडमिट कार्ड डाउनलोड केले नसल्यास खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आत्ताच डाउनलोड कराः
IBPS लिपिक पूर्वपरीक्षा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- SSC Recruitment 2020: १२वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 5 हजार पदांची बंपर भरती
कोविड-१९ बाबत परीक्षा केंद्रावर नियम आणि सूचना पाळा
आयबीपीएसने कोविड-१९ साथीच्या दरम्यान परीक्षा आयोजित केली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी काही नियम आणि सूचना पाळणे गरजेचे आहे.
- परीक्षार्थींनी संबंधित प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार, वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे.
- कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी रिपोर्टिंग टाइम देण्यात आला आहे.
- फेस मास्क घालणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी हातमोजे, पाण्याची बाटली (पारदर्शक) आणि हँड सॅनिटायझर (५० मि.ली.) बाळगणे अनिवार्य आहे.
- बॉल पॉईंट पेन तयार ठेवा.
- आपली वैयक्तिक वस्तू कोणाबरोबर शेअर करू नका.
- एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवा
- आपल्या मोबाइल फोनमध्ये आरोग्यसेतू अॅप इन्स्टॉल करा, आणि वेळोवेळी त्याचा वापर करा.
- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)