IBPS द्वारे बॅंक प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या 4000 हून अधिक पदांची भरती!

IBPS द्वारे बॅंक प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या 4000 हून अधिक पदांची भरती! पदवीधरांनो, करा अर्ज
IBPS
IBPSSakal
Summary

अर्ज करण्याची व शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

Summary

सोलापूर : इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन (Institute of Banking Personnel Selection - IBPS) ने विविध सरकारी बॅंकांमध्ये 4135 प्रोबेशनरी ऑफिसर / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची व शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. IBPS PO प्रिलिम्स परीक्षा 4 डिसेंबर आणि 11 डिसेंबर 2021 रोजी घेतली जाईल. मुख्य परीक्षा जानेवारी 2022 मध्ये घेतली जाऊ शकते.

रिक्त पदे व आरक्षण

एकूण 4135 पदांची भरती होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 1600 जागा आहेत. OBC साठी 1102, SC साठी 679, ST साठी 350 आणि EWS प्रवर्गासाठी 404 जागा राखीव आहेत.

IBPS
UPSC नागरी सेवा मोफत कोचिंगसाठी यंदा आले कमी अर्ज! वेळापत्रकात बदल

जाणून घ्या पात्रता व वयोमर्यादा

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधारक या पदांसाठी पात्र आहे. अर्जदाराचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे. 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी वयाची गणना केली जाईल. उमेदवाराचा जन्म 2 ऑक्‍टोबर 1991 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑक्‍टोबर 2001 नंतर झालेला नसावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात तीन वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट असेल.

या बॅंकांसाठी होईल भरती

या अधिसूचनेद्वारे बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, यूको बॅंक आणि युनियन बॅंक ऑफ इंडियामधील प्रोबेशनरी ऑफिसर / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अशी होईल निवड

प्रिलिम्समधील कामगिरीच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मेन्समध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

प्रिलिम्स परीक्षा

इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचे प्रश्न असतील. इंग्रजीमध्ये 30 गुणांचे 30 प्रश्न असतील जे 20 मिनिटांत सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडमध्ये 20 मिनिटांत 35 गुणांचे 35 प्रश्न असतील. रिझनिंगमध्येही 35 गुणांचे 35 प्रश्न असतील जे 20 मिनिटांत सोडवावे लागतील. मेन्समध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड, जनरल / इकॉनॉमी / बॅंकिंग अवेअरनेस, इंग्लिश लॅंग्वेज आणि डेटा ऍनालिसिस आणि इंटरप्रिटेशन या विषयांवर प्रश्न असतील.

अर्जाची प्रक्रिया

अर्ज करण्यापूर्वी तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो (4.5cm, 3.5cm), स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, स्कॅन केलेली हाताने लिहिलेली डिक्‍लेरेशन ठेवा. आता www.ibps.in ला भेट देऊन अर्ज करा. अर्ज करण्यासाठी 'CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRPPROBATIONARY OFFICERS / MANAGEMENT TRAINEES (CRP-PO/MT-XI)' या लिंकवर क्‍लिक करा आणि अर्ज करा. अर्ज करताना तुम्हाला स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि घोषणापत्र अपलोड करावे लागेल.

IBPS
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबरनंतर 13 हजार पदांची भरती

अर्जाचे शुल्क

  • सामान्य, OBC आणि EWS श्रेणी : 850 रुपये

  • SC, ST आणि दिव्यांग : 175 रुपये

  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल वॉलेटद्वारे फी भरता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com