esakal | CA च्या परीक्षा ५ जुलैपासून; आयसीएआयची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

CA च्या परीक्षा ५ जुलैपासून; आयसीएआयची घोषणा

CA च्या परीक्षा ५ जुलैपासून; आयसीएआयची घोषणा

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : द इनस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस्‌ ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यावतीने सीए अभ्यासक्रम आणि अन्य परीक्षांचा सुधारित कालावधी जाहीर केला आहे. ‘आयसीएआय’तर्फे घेण्यात येणाऱ्या सीए इंटरमिजीएट, फाइनल आणि पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सेससह अन्य परीक्षा आता पाच जुलै २०२१पासून होणार आहेत.

हेही वाचा: शिवसेना सभापतीचा सिंहगडमध्ये हॉटेलवर हल्ला; महिलांनाही मारहाण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मे २०२१मध्ये होणाऱ्या या परीक्षा स्थगित केल्या होत्या. आता या परीक्षा जुलैपासून घेण्यात येतील. सीए परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘आयसीएआय’ने दिलेल्या सुचनेनुसार चार्टर्ड अकाऊंटंट एंटरमिजिएट (ओल्ड स्किम), इंटरमिजीएट (न्यू स्किम) आणि फायनल (ओल्ड आणि न्यू स्किम) आणि इनश्युरन्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल एक्झामिनेशन ॲण्ड इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्टच्या मे- २०२१मध्ये होणाऱ्या परीक्षा आता पाच जुलैपासून होणार आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच संस्थेच्या ‘www.icai.org’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे., अशी माहिती ‘आयसीएआय’च्या परीक्षा विभागाचे अपर सचिव एस.के.गर्ग यांनी दिली आहे.

हेही वाचा: सरकारी यंत्रणेला लागली ‘बुरशी’; इंजेक्शनसाठी प्रतीक्षा संपेना