esakal | IGNOU : असाइनमेंट सादर करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत मुदत !
sakal

बोलून बातमी शोधा

IGNOU

IGNOU : असाइनमेंट सादर करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत मुदत !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने (IGNOU) असाइनमेंट्‌स व इतर रिपोर्ट सादर करण्याची अंतिम तारीख 15 जून 2021 पर्यंत वाढविली आहे.

सोलापूर : इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने (Indira Gandhi National Open University) (IGNOU) असाइनमेंट्‌स व इतर रिपोर्ट सादर करण्याची अंतिम तारीख 15 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. यामुळे जून 2021 टर्म-एंड परीक्षा (TEE) देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. "इग्नू'ने अधिकृत संकेतस्थळ ignou.ac.in वर जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, जून 2021 टीईईसाठी विद्यार्थी 15 जून 2021 पर्यंत आपले असाइनमेंट्‌स, अंतिम प्रकल्प, प्रबंध, फिल्ड वर्क जर्नल आणि इंटर्नशिप अहवाल सादर करू शकतात. याआधी असाइनमेंट आणि रिपोर्ट सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे होती. (IGNOU : Deadline for submission of assignments is now fifteenth June)

हेही वाचा: नवे शिक्षण धोरण; आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण 

विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे, की इग्नूने असाइनमेंट, अंतिम प्रकल्प, शोध प्रबंध, फिल्ड वर्क जर्नल आणि इंटर्नशिप अहवाल जून 2021 मध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही मोडसाठी टीईई सादर करण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. विद्यापीठाचे यूजी, पीजी आणि इतर अभ्यासक्रमांचे जे विद्यार्थी जूनमध्ये परीक्षा फॉर्म भरले आहेत किंवा भरणार आहेत, त्यांनी आपल असाइनमेंट व रिपोर्ट इग्नूच्या पोर्टलवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन सबमिट करू शकतात.

हेही वाचा: कोरोनामुळे 4500 बालके झाली अनाथ ! राज्य सरकार करणार अनाथ बालकांच्या शिक्षणाचा खर्च

परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीखही 15 जून

यापूर्वी इग्नूने जून 2021 टीईई परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 निश्‍चित केली होती. जून 2021 च्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, ज्यांनी अद्याप परीक्षेचे फॉर्म सादर केलेले नाहीत, ते इग्नूच्या परीक्षा पोर्टल, exam.ignou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइनद्वारे फॉर्म भरू शकतात. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे, की 15 जूनपर्यंत त्यांना कोणत्याही विलंब शुल्काशिवाय परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरता येईल.