IIM Admission Process : नव्या नवेलीने IIM मध्ये घेतलेल्या कोर्ससाठीची फि किती आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया!

IIM मध्ये नुकतेच ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम (BPGP)चा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्यासाठीच नव्याने प्रवेश घेतला आहे.
 IIM Admission Process
IIM Admission Process esakal
Updated on

IIM Admission Process :

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने अहमदाबाद येथे असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA) मध्ये प्रवेश घेतला आहे. आयआयएमएमध्ये प्रवेश मिळवणे सोपी गोष्ट नाही. केवळ आर्थिक गणित जमले म्हणून तिथे प्रवेश मिळतो असं नाही. तर, त्यासाठी बुद्धिची गणितेही जमायला लागतात.

नव्याने IIMA मध्ये प्रवेश घेतल्याची पोस्ट सोशल मिडियावर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “स्वप्न सत्यात उतरतात. पुढील 2 वर्ष चांगले लोक आणि शिक्षकांसह!" IIM मध्ये नुकतेच ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम (BPGP)चा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्यासाठीच नव्याने प्रवेश घेतला आहे.

 IIM Admission Process
Supriya Sule on BJP Baramati : बारामती म्हणजे IIT, IIM सारखं, असं सुप्रिया सुळे का म्हणाल्या ?

आयआयएमएमध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तर, अनेकांनी परदेशातही उच्चपदी झेप घेतली आहे. आयआयएमएमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय-काय करावे लागते. त्याची प्रवेश प्रक्रिया काय आहे याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA) ने या वर्षी जानेवारीमध्ये नवीन दोन वर्षांचा ऑनलाइन एमबीए प्रोग्राम सुरू केला. नव्यानेही एमबीएला प्रवेश घेतला आहे. आयआयएम अहमदाबादचा हा नवीन अभ्यासक्रम मिक्स प्रोग्राम आहे. ज्यामध्ये कॅम्पसमध्ये, पर्सनली आणि थेट ऑनलाइन सत्रांचा समावेश आहे.

 IIM Admission Process
Online Shopping: ऑनलाइन शॉपिंगवर महिलांपेक्षा पुरुषांचा खर्च 36 टक्के जास्त; अहवालातून माहिती आली समोर

केस-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कठोर अभ्यासक्रमासह, IIMA चा हा कार्यक्रम कार्यरत व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्यांसाठी डिझाइन केला आहे. कोर्स डिलिव्हरी ऑनलाइन सिंक्रोनस मोडमध्ये पाच वेगवेगळ्या ऑन-कॅम्पस मॉड्यूल्सच्या संयोजनाद्वारे होते.

IIM च्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनूसार, या अभ्यासक्रमाची फि २० लाख आहे. ही केवळ शैक्षणिक फि आहे, यामध्ये वाहतूक, वसहतिगृह यांचा समावेश नाही.

या कोर्ससाठी काय पात्रता लागते?

  • या कोर्ससाठी प्रवेश घेणारा उमेदवार ३० जून २०२४ पर्यंत शिक्षण पूर्ण करून किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

  • उमेदवाराचे वय ३० जून २०२४ रोजी २४ वर्ष असावे.

  • उमेदवाराकडे कोणत्याही विषयाची पदवी/सीए/सीएस/आईसीडब्ल्यूए असावी. तसेच, मान्यताप्राप्त महाविद्यालयातून सीजीपीएमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत.

 IIM Admission Process
NDA Khadakwasala: 'आता जबाबदारी देशसेवेची!' राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

प्रवेशासाठीचे नियम काय आहेत?

  1. ऑनलाइन एमबीएसाठी डिझाइन केलेली ऑनलाइन IIMA प्रवेश परीक्षा (IAT) किंवा

  2. एका वैध CAT स्कोर १ मे, २०२४ च्या आधी ५ वर्षांच्या आत घेतलेला CAT स्कोर किंवा

  3. एका वैध GMAT/GRE स्कोर १ मे, २०२४ च्या ५ वर्षाच्या आत घेतलेले GMAT/GRE स्कोर

  4. नव्या GMAT फोकस एडिशन परीक्षेचेही स्कोर ग्राह्य धरले जातील

  5. शेवटच्या निवडीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल

 IIM Admission Process
Navya Naveli Nanda : IIM अहमदाबादमध्ये कोटामधून मिळाला का अमिताभ यांच्या नातीला प्रवेश ? कॉलेजचे प्रोफेसर म्हणाले...

IIM अहमदाबादच्या २०२४-२६ बॅचसाठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी ते मे दरम्यान झाली आणि IAT परीक्षा १९ आणि २६ मे रोजी झाली. त्यानंतर २९ मे रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली आणि जून महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या.

१२ जून रोजी अंतिम ऑफर देण्यात आल्या, त्यानंतर १ ऑगस्ट रोजी प्री एमबीए मॉड्यूल आणि १ सप्टेंबर रोजी IIM अहमदाबाद कॅम्पसमध्ये कॅम्पस मॉड्यूल देण्यात आले. ऑनलाइन मॉड्यूल १२ सप्टेंबरपासून सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com