
NEET PG समुपदेशनाला विलंब! IMA ची पंतप्रधानांना हस्तक्षेपाची विनंती
NEET-PG परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली होती. परंतु, NEET-PG 2021 च्या समुपदेशनात (Counselling) विलंब होत आहे. या विलंबाविरोधात निवासी डॉक्टरांनी (Doctor) संप पुकारला आहे. या संपावर चिंता व्यक्त करत, इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association - IMA) ने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ही समस्या सोडवण्यासाठी आणि कोरोना (Covid-19) विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचीही विनंती आयएमएने केली आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आयएमएला निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ उतरावे लागेल, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. (IMA urges PM to intervene as NEET PG counselling is delayed)
हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली 247 लिपिक पदांची भरती!
IMA ने सांगितले की, कायदेशीर अडथळ्यांमुळे समुपदेशन थांबवण्यात आले आहे. परिणामी 45 हजार डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आयएमएने पंतप्रधानांना या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा: नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 15 टक्क्यांपेक्षा कमी अर्ज
डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे की, 'देशातील साडेतीन लाख डॉक्टरांच्या वतीने आम्ही त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या निवासी डॉक्टरांना नैतिक पाठिंबा व्यक्त करतो. यासोबतच, आम्ही आरोग्य मंत्रालयाला (Health Ministry) विनंती करतो की, पंतप्रधानांच्या सल्ल्याने आणि हस्तक्षेपाने हे प्रकरण लवकरात लवकर हाताळण्यात यावे.
Web Title: Ima Urges Pm To Intervene As Neet Pg Counselling Is Delayed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..