कंपन्यांसाठी प्लेसमेंटचे महत्त्व

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 30 January 2020

कोणत्याही कंपनीला किंवा इतर संस्थांनादेखील उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे मॅनपावर (मनुष्यबळ). 

 संधी नोकरीच्या 
कोणत्याही कंपनीचा कारभार प्रामुख्याने चार ‘एम’ वर चालतो. 

कोणत्याही कंपनीला किंवा इतर संस्थांनादेखील उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे मॅनपावर (मनुष्यबळ). 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात २०२२ पासून प्रत्येक वर्षाला सुमारे २१ वर्षे वयोगटातील सुमारे २.१ कोटी विद्यार्थी असतील व त्यातील ७० टक्के विद्यार्थ्यांना, म्हणजेच सुमारे १.८ कोटी विद्यार्थ्यांना, नोकरीची गरज असेल. आपल्याला या देशात तरुणाईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. बेरोजगारांचे प्रश्‍न वेळीच न सोडविल्यास ही सामाजिक समस्या अक्राळविक्राळ स्वरूप धारण करेल. एकीकडे महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन त्यांना शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध करून देतात, तर दुसरीकडे शासन शुल्क ठरवून तसेच ‘एआयसीटीई’सारख्या संस्था विद्यार्थी संख्येप्रमाणे शिक्षकांचे प्रमाण ठरवणे, प्राध्यापकांचे केडर रेशो (प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक) यांचे प्रमाण ठरवणे, कोर्सेसला मान्यता देणे यासारखी कामे करत असतात. मात्र, विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देण्याचे वा स्वयंरोजगारासारखे उपाय शंभर टक्के उपलब्ध करून देण्याचे धोरण शासन राबवीत नाही. त्यामुळे ज्या महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटचा इतिहास चांगला आहे, अशाच महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे प्रामुख्याने विद्यार्थी व पालकांचा कल असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: importance of placement for companies