High Court : 5 वी ते 11 वी बोर्ड परीक्षांबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या दोन खंडपीठांचा अंतरिम आदेश बाजूला ठेवला होता.
Karnataka High Court
Karnataka High Courtesakal
Summary

सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातही परत पाठवले होते.

बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांच्या इयत्ता ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षेंबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. परीक्षा रद्द करणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान दिले होते.

राज्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती के. सोमशेखर आणि न्यायमूर्ती राजेश राय यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. याआधी, नोंदणीकृत विनाअनुदानित खासगी शाळा (School) संघटनेच्या बाजूने उच्च न्यायालयाच्या निकालाने परीक्षा रद्द केल्या होत्या. आणि त्यानंतर खंडपीठाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातही परत पाठवले होते.

Karnataka High Court
Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्गात उमेदवारीचे सस्पेन्स; भाजप-शिवसेनेत चढाओढ, विलंबाचा फटका कुणाला?

या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या दोन खंडपीठांचा अंतरिम आदेश बाजूला ठेवला होता. ज्याने राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी इयत्ता ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या बोर्ड परीक्षा घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्थगित केला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश बाजूला ठेवत प्रकरण खंडपीठाकडे पाठवले आहे.

Karnataka High Court
Kolhapur LokSabha : पहिल्याच निवडणुकीत सदाशिवराव मंडलिकांनी 61 हजारांच्या फरकानं घाटगेंवर मिळवला विजय!

यानंतर कर्नाटक सरकारने बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यापूर्वी शाळा संघटनेच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, ज्या सरकारी अधिसूचना या बोर्ड परीक्षा घेण्याच्या ठरवल्या होत्या, त्या कर्नाटक शिक्षण कायद्याचे समर्थन करत नाहीत. कारण ते कायद्याच्या अंतर्गत नियम नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com