esakal | उत्पन्न कमी अन् खर्च दुप्पट! ऑनलाईन शिक्षणाचा पालकांना भुर्दंड
sakal

बोलून बातमी शोधा

वीजच नाही तर ऑनलाईन शिक्षण कसे? रायगडमधील शाळांना अडसर

उत्पन्न कमी अन् खर्च दुप्पट! ऑनलाईन शिक्षणाचा पालकांना भुर्दंड

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : मागील वर्षीप्रमाणे या वर्षाची सुरुवातही ऑनलाईन झाली. शाळा प्रत्यक्ष बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षणाचे Online Education शुल्क पालकांना भरावे लागत आहे. मुलांच्या वह्या, पुस्तके, शालेय साहित्याच्या खर्चात स्मार्टफोन, टॅब, इंटरनेट अशा संसाधनाचा आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या काळात बहुतांश पालकांचे उत्पन्न अर्ध्यावर आले असून त्यात पाल्यांचा शैक्षणिक Education खर्च दुपटीने वाढला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यातून सावरण्यासाठी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधला. मात्र, यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षणाचे पालकांना शुल्क द्यावे लागते. ऑनलाईन शिक्षणासाठी Aurangabad मुलांना वह्या, पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्याची गरज पडतेच, सोबत इंटरनेट, स्मार्टफोन, टॅब अशा संसाधनाचा खर्च वाढल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.income low, but expenditure high online education burden on parents glp88

हेही वाचा: तरुणाची आत्महत्या, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

त्यामुळे पालकांचा अतिरीक्त खर्च दुपटी-तिपटीने वाढला आहे. अध्ययन अध्यापन ऑनलाईन असल्याने पालकांना दरमहा ठराविक रकमेचे रिचार्ज करावेच लागते. एका घरात दोनपेक्षा जास्त मुले असतील तर पालकांचा मोबाईलसह इंटरनेटच्या खर्चात वाढ झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेट डाटा Internet Data पुरत नसल्याने वायफाय सेवा घ्यावी लागते. सर्वसामान्यांसह नोकरदार पालकांना मुलांसाठी दरमहा साधारणतः पाचशे ते सहाशे रुपये इंटरनेट, मोबाईल रिचार्जसाठी खर्च करावे लागत आहेत.

ग्रामीण भागात दैनाच

यंदा शैक्षणिक वर्ष सुरु होताच शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप खरेदी केले. मात्र, शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे रिचार्ज करुनही इंटरनेट सेवा मिळत नाही, शिवाय पैसाही वाया जातो. ज्या घरात दोन- तीन मुले आहेत, तिथे पुरेशा इंटरनेट डाटासाठी वायफाय सेवा घ्यावी लागते. पावसाळ्यामुळे अनेक वेळा ही सेवादेखील कोलमडते, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये पिकांचे मोठे नुकसान, तिघांचा मृत्यू

मला दोन मुले आहेत. मुलगी सातवीला असून मुलगा पाचवीला आहे. दोघांचे शुल्क भरणे अद्याप बाकी आहे. वह्या, पाठ्यपुस्तके घ्यायची आहे. घरात केवळ माझ्याकडे स्मार्टफोन आहे. पण कामासाठी मला दिवसभर घराबाहेर राहावे लागते. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची गरज आहे. शाळेकडून शुल्काची मागणी सुरु आहे. शुल्क भरले नाही तर शिक्षण बंद करण्याची धमकी शाळेकडून देण्यात येत आहे.

- अजिनाथ घोडके, पालक

ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. मुलं ऑनलाईन तास संपल्यानंतर देखील युट्यूब, मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे ठराविक रकमेचे पालकांनी केलेले रिचार्ज लवकर संपून अधिकचा खर्च वाढतो.

- वैशाली यादव, पालक

loading image