esakal | अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये पिकांचे मोठे नुकसान, तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : अतिवृष्टीमुळे मालेगाव (ता. अर्धापूर) येथील ज्ञानेश्‍वर इंगोले यांच्या हळद पिकाचे नुकसान झाले.

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये पिकांचे मोठे नुकसान, तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यात Nanded रविवारी (ता.११) झालेल्या अतिवृष्टीमुळे Heavy Rain साडेतीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या सोबतच तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चार मोठी जनावरे दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात काही दिवस मंदावलेला पाऊस रविवारी जोरदार झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात झाली. तसेच दुबार पेरणीचे संकट टळले. परंतु हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे खरीप पिकांचेही नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यातील सात तालुक्यासह ३१ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. सरासरी ५६ मिलिमीटर झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. यात पिके खरडून गेली तर काही ठिकाणी पाणी साचून पिकाचे नुकसान झाले आहे. heavy rain destroyed crops, three people died in nanded glp88

हेही वाचा: नांदेडमध्ये गुन्हे शाखेने आठ लाखांचे ५१ मोबाईल काढले शोधून

अतिवृष्टीत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ७७ शेतकऱ्यांचे तीन हजार ३३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या सोबतच तिघेजण या आपत्तीत मृत्यू पावले आहेत. यात मुखेड तालुक्यातील कापरवाडी येथील साईनाथ प्रमोद लांडगे (वय आठ) या मुलाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर लोहगाव (ता. बिलोली) Biloli येथील सुशीला शिवराम चिंतले व पानशेवडी अंतर्गत गणातांडा (ता. कंधार) Kandhar येथील दिनेश केशव पवार (वय २५) या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. यात संदीप केशव पवार जखमी झाला आहे. जिल्ह्यात चार मोठी जनावरे दगावली. यात शिराढोण (ता. कंधार) येथील दत्ता गोदरे यांची म्हेस, लोहा येथील दोन जनावरे वीज पडून मृत्यू पावले. जांब बुद्रुक येथील राम पुंडे यांची एक म्हेस मृत्यू पावली. जिल्ह्यातील ४९ घरांची अंशतः पडझड झालेल्या ची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा: Corona Updates : जालना जिल्ह्यात सध्या फक्त ७२ कोरोना रुग्ण

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीची माहिती ईफ्को टोकीओ कृषी पिक विमा कंपनीकडे त्यांच्या संकेत स्थळावर जाऊन कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. त्यानुसार मंगळवारी शेतकऱ्यांनी विमा अॅप, सी सी एस, सी एस सी, महा ई सुविधा केंद्र आणि जमेल तसे विमा कंपनीला कळविण्याचे प्रयत्न केला. मात्र, यात शेतकऱ्यांना अडचणी आल्या. विमा हप्ता भरलेल्या पावती क्रमांक फीड केला तर कंपनीची साईट इनव्हॅलीड असा संदेश मिळाला. तर दुसरीकडे उपविभाग कोणता आहे? असे विचारले. आता उपविभाग महसूलचा का?, कृषी विभागाचा का? की पावसाची नोंद घेतली जाते त्या महसुल मंडळाचा? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले.

loading image