भारतातील पहिला 'स्कील इम्पॅक्ट बॉण्ड' लॉन्च; तरुणांना रोजगाराची मोठी संधी

महिला आणि मुलींना रोजगारासाठी प्राधान्य
Skill India Bond
Skill India Bond
Updated on

नवी दिल्ली : नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं (NSDC) मंगळवारी भारतातील पहिला 'स्कील इम्पॅक्ट बॉण्ड' जाहीर केला आहे. ग्लोबल पार्टनर्सच्या सहकार्यानं या बॉण्डचं लॉन्चिंग करण्यात आलं असून १४.४ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे. या बॉण्डचा फायदा सुमारे ५०,००० तरुण-तरुणींना होणार आहे.

Skill India Bond
आर्यनची आजची रात्र तुरुंगातच; उद्या पार पडणार सुनावणी

या बॉण्डसाठी NSDCनं एचआरएच प्रिन्स चार्ल्स ब्रिटिश एशिअन ट्रस्ट, मायकल अँड सुसान डेल फाउंडेशन, चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन, HSBC इंडिया, JSW फाउंडेशन आणि दुबई केअर्स यांच्यासह FCDO (युके सरकार) आणि USAID हे टेक्निकल पार्टनर्सद्वारे निधी उभा केला आहे.

Skill India Bond
क्रूझ पार्टीत आर्यन निमंत्रित पाहुणा होता; रोहतगींचा हायकोर्टात युक्तीवाद

या बॉण्डच्या लॉन्चिंगनंतर NSDCनं म्हटलं की, "स्कील इम्पॅक्ट बॉण्ड (SIB) हा सार्वजनिक, खासगी सहकार्य आणि सार्वजनिक-खासगी पार्टनरशीप ऑर्गनायझेशनशी संबंधीत पहिला इम्पॅक्ट बॉण्ड आहे. यासाठी CIFF, HSBC india, JSW फाउंडेशन आणि दुबई केअर्स यांनी यासाठी निधीसाठी मदत केली आहे."

लक्ष्य गटामध्ये 60 टक्के महिलांचा समावेश

या बॉण्डच्या लक्ष्य गटामध्ये 60 टक्के महिला आणि मुलींचा समावेश आहे. कोविडच्या प्रभावातून बाहेर पडत असलेल्या रिटेल उद्योग, कापड उद्योग, आरोग्यसेवा आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रात त्यांना कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन सुसज्ज करणे आणि वेतन-रोजगारात मिळवून देणं हे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com