

मुंबई : कॅडेलिया या क्रूझवर झालेल्या पार्टीशी आर्यन खानचा संबंध नाही, त्याला तिथं पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं, असा युक्तीवाद वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतोगी यांनी मुंबई हायकोर्टात केला. हायकोर्टात सध्या आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे.
अॅड. रोहतोगी म्हणाले, आर्यन खानजवळ एनसीबीला कोणतंही ड्रग्ज सापडलेलं नाही तसेच त्याची कोणतीही वैद्यकीय तपासणी झालेली नाही. ज्या लोकांची या प्रकरणी साक्ष नोंदवण्यात आली त्यांनी आपला जबाब पलटला आहे. आर्यनला प्रतीक गाबा यानं विशेष पाहुणा म्हणून निमंत्रित केलं होतं. दरम्यान, आर्यनला क्रूझवर पोहोचण्याआधीच ताब्यात घेण्यात आलं. आर्यनचा मित्र असलेल्या अरबाज मर्चंटच्या शूजमधून ६ ग्रॅम ड्रग्ज मिळाले होते. पण आर्यनच्या जवळ कोणतंही ड्रग्ज आढळून आलं नव्हतं.
रोहतगी पुढे म्हणाले, अरबाजकडे ड्रग्ज होतं किंवा नाही याचा अर्थ त्यानं जाणीवपूर्वक आपल्याजवळ ते ठेवलं होतं, असाही होत नाही. हे ड्रग्ज केवळ ६ ग्रॅम होतं म्हणजे खूपच कमी प्रमाणात होतं. आर्यनला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं अडकवण्यात आलं आहे. एनसीबीनं आर्यनचा जबाब एनडीपीएस अॅक्टच्या कलम ६७ अंतर्गत नोंदवण्यात आलं. जे दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलं. आर्यनला कट-कारस्थान करुन अटक करण्यात आली आहे. आम्ही हा मुद्दा सुप्रीम कोर्टातही मांडला आहे.
दरम्यान, क्रूझ पार्टीबाबतचा एकही चॅट एनसीबीला मिळालेलं नाही. गाबानं आर्यनला बोलावलं होतं. त्यामुळे तो आपला मित्र अरबाजसह तिथं गेला होता. मिळालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा याच्याशी काहीही संबंध नाही. आर्यनविरोधात ड्रग्ज सेवन, ड्रग्ज बाळगणे किंवा विक्री केल्याचा गुन्हा दाखल नाही. साक्षीदारांनाही स्पष्टपणे म्हटलं आहे की, आर्यनचा या केसशी संबंध नाही, असंही रोहतोगी यांनी होयकोर्टात म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.