India Post Recruitment 2022: पोस्ट विभागाने 650 पदांसाठी मागवले अर्ज; पगार 30,000 रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Post Recruitment 2022
India Post Recruitment 2022: पोस्ट विभागाने 650 पदांसाठी मागवले अर्ज; पगार 30,000 रुपये

India Post Recruitment 2022: पोस्ट विभागाने 650 पदांसाठी मागवले अर्ज; पगार 30,000 रुपये

IPPB GDS Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB), पोस्ट विभाग, संचार मंत्रालयामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 650 पदे भरली जातील. या पदांसाठी अद्याप अर्ज न केलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे.

याशिवाय, उमेदवार थेट https://ibpsonline.ibps.in/ippbgdsapr22/ या लिंकद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच, https://www.ippbonline.com/documents/31498/132994 या लिंकवर क्लिक करून, तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.

हेही वाचा: 'इंडियन ऑइल'मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी

महत्त्वाच्या तारखा-

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 10 मे 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मे 2022

रिक्त जागांचा तपशील-

ग्रामीण डाक सेवक – 650

पात्रता निकष-

भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / बोर्ड मधून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, GDS म्हणून किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

हेही वाचा: BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती; असा करा अर्ज

वयोमर्यादा-

उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

अर्ज शुल्क-

उमेदवारांना रु. 700/- भरावे लागतील.

पगार-

उमेदवारांना रु. 30,000/- दरमहा दिले जातील.

Web Title: India Post Recruitment 2022 Ippb Gds Recruitment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top