BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती; असा करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF Recruitment 2022
BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती; असा करा अर्ज

BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती; असा करा अर्ज

BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दल, BSF द्वारे विविध 'गट -ब' पदांसाठी भरती केली जात आहे. या अंतर्गत BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार ८ जून २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. 25 एप्रिल 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पदांसाठी होणार भरती-

या भरतीद्वारे एकूण 90 पदांची भरती केली जाणार आहे.

  1. निरीक्षक- 1 पद,

  2. कनिष्ठ अभियंता- 32 पदे

  3. उपनिरीक्षक- 57

निवड प्रक्रिया-

या पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाईल. जे 2 टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यशस्वी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.

वय श्रेणी-

जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही माहितीसाठी, BSF च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.