Post Job : १०वी उत्तीर्णांसाठी परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी; टपाल विभागात भरती

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे असावी. राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Post Job
Post Jobsakal

मुंबई : इंडिया पोस्टमध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. एकूण हून ४० हजारांहून अधिक पदे भरली जातील.

ग्रामीण टपाल पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्यावी. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Post Job
BSF Job : बीएसएफमध्ये भरती, लाखो रुपये मिळणार पगार; अर्ज करण्यासाठी फक्त २ दिवस

रिक्त जागांचा तपशील

एकूण पोस्ट – ४०, ८८९

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २७ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ फेब्रुवारी २०२३

अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख - १६ फेब्रुवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

ग्रामीण टपाल सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचे १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला दहावीत गणित आणि इंग्रजी विषयही असणे आवश्यक आहे.

Post Job
Government Job : १०वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; ३५ हजारांपर्यंत मिळणार पगार

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे असावी. राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. आरक्षित प्रवर्ग आणि महिला प्रवर्गासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी कोणत्याही लेखी परीक्षेची तरतूद नाही. उमेदवारांची निवड करण्यासाठी इयत्ता १० वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

पगार

BPM म्हणजेच शाखा पोस्टमास्टर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १२ हजार ते २९,३८० रुपये पगार, तर टपाल सेवक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १०,००० ते २४,४७० रुपये पगार दिला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com