
Unemployment Rate May 2025: भारतामधील बेरोजगारी दरात मे 2025 मध्ये लक्षणीय वाढ झाली असून, तो एप्रिलमधील 5.1% वरून 5.6% वर पोहोचल्याची माहिती पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) च्या नव्या अहवालातून समोर आली आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये बेरोजगारी वाढलेली दिसून आली असून, युवक आणि महिलांवर याचा विशेष परिणाम झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.