esakal | सैन्यात नोकरीची संधी ! पुरुष आणि महिला उमेदवार करू शकतात अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या विधवा आणि अविवाहित इंजिनिअर पुरुष आणि महिलांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सैन्यात नोकरीची संधी ! पुरुष आणि महिला उमेदवार करू शकतात अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

Indian army recruitment 2021 : भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short service commission) (SSC) 2021 मध्ये महिला आणि पुरुष अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज जारी केला आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये (Indian Army SSC job 2021) संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या विधवा आणि अविवाहित इंजिनिअर पुरुष आणि महिलांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याच्या joinindianrmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन 23 जून 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. (Indian Army notification 2021 register for 191 ssc men and women officers post)

हेही वाचा: लवंगीतील गतिमंद बालगृहातील 41 मुले कोरोना पोझिटिव्ह !

SSC मध्ये या पदांसाठी 191 जागा रिक्त आहेत. उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोटिफिकेशन डाउनलोड करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख (indian army recruitment 2021 last date) 23 जून 2021 आहे.

उमेदवारांमध्ये हवी ही पात्रता...

  • उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्‍यक आहे.

  • नेपाळचा विषय असो किंवा पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकी देश केनिया, युगांडा, संयुक्त प्रजासत्ताक टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे, इथिओपिया आणि व्हिएतनाममधून भारतात स्थायिक होण्याच्या उद्देशाने आलेला भारतीय वंशाची व्यक्ती, भारत सरकारकडून पात्रतेचे प्रमाणपत्रधारक

  • उमेदवार इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर झाला आहे किंवा पदवीच्या अंतिम वर्षाचा आहे

  • एसएससी अधिकारी पदांसाठी पुरुष आणि महिला दोघांचेही वय 20 ते 27 च्या दरम्यान असावे

  • संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी कमाल वय 35 वर्षे असावे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तमिळनाडूच्या चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये (officiers training academy) 49 आठवड्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. भरतीसाठी असलेल्या उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार केली जाईल आणि शॉर्ट लिस्टेड विद्यार्थ्यांना त्यांच्या केंद्र वाटपाची माहिती मेलद्वारे देण्यात येईल. वेबसाइटवर लॉग इन करून उमेदवारांना केंद्र वाटपाची माहिती मिळू शकते. एसएससीचा हा कोर्स तमिळनाडूच्या चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीत ऑक्‍टोबरपासून सुरू होईल.