Indian Army Recruitment : 191 जागांसाठी भरती; पगार 2.5 लाख

Indian Army
Indian Armyesakal

नवी दिल्ली : भारतीय सेनेमध्ये (Indian Army Recruitment 2021) इंजिनिअर्सच्या तब्बल 191 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे. तसेच शहिद जवानांच्या पत्नींना या पदांसाठी अर्ज करायचं असेल तर ते देखील करू शकता. कसं ते वाचा....

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसंच शाहिद जवानांच्या पत्नींना या पदांसाठी अर्ज करायचं असेल तर त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

Indian Army
पावसामुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा 'परीक्षा' घेणार

उमेदवारांना लग्न करण्याची परवानगी नाही

49 आठवड्यांची ही ट्रेनिंग असून SSC (Tech) आणि SSCW (Tech) या पदांसाठी ही भरती असणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी चेन्नई इथे त्यांच्या गुणवत्तेच्या अंतिम क्रमानुसार आणि पात्रता निकषानुसार ट्रेनिंग देण्यात येणार आहे. आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही. परंतु पालकांसोबत राहण्याची परवानगी देण्यात येईल.

Indian Army
संधी करिअरच्या... : नर्सिंगमधील उज्ज्वल भवितव्य

असे करा अप्लाय

www.joinindianarmy.nic.in ही वेबसाईट ओपन करा.

यानंतर Officer Entry Application /Login’ वर क्लिक करा.

Login वर क्लिक करा.

स्वतःच्या प्रोफाइलचं रजिस्ट्रेशन करा. आपली संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करा.

Apply वर क्लिक करा.

अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथे तुमची सर्व माहिती भरा.

तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती भरा.

Save & Continue वर क्लिक करा.

वयोमर्यादा

SSC (Tech) - 20 to 27 years as on 01 Apr 2022

SSCW (Tech) - जास्तीत जास्त 35 years of age as on 01 Apr 2022.

अर्ज पाठववण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com