CRPF मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती I Government Job | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CRPF Recruitment 2021

सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी CRPF मध्ये मोठी संधी उपलब्ध झालीय.

CRPF मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

CRPF Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी CRPF मध्ये मोठी संधी उपलब्ध झालीय. केंद्रीय राखीव पोलीस दलानं (CRPF) स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (SMO) आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरी मिळविण्यासाठी पुरुष आणि महिला उमेदवारांना मुलाखतीला हजर राहावं लागणार असून इथं एकूण 60 आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

दरम्यान, उमेदवारांना देण्यात आलेल्या मुदतीच्या आत स्वत:ची नोंदणी करायचीय. एकदा अर्जाची विंडो बंद झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला नोंदणी करता येणार नाही. त्यानंतर केवळ नोंदणीकृत उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावं लागेल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलाय. या पदभरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाईल. 22 आणि 29 नोव्हेंबर रोजी विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer, GDMO) (पुरुष आणि महिला) यांची मुलाखत होणार आहे.

हेही वाचा: BHEL मध्ये नोकरीची संधी; 80 हजारापर्यंत मिळेल पगार

  • रिक्त जागा तपशील (CRPF MO रिक्त जागा 2021 तपशील)

  • स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (SMOs) - 29 पदे

  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्स (GDMOs) – 31 पदे

हेही वाचा: 14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!

शैक्षणिक पात्रता : एसएमओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील कामाच्या अनुभवासह पदव्युत्तर पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, तर जीडीएमओ पदासाठी अर्जदारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.

पगार : एसएमओ पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 85 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर जीडीएमओ पदासाठी अर्जदारांना दरमहा 75 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

loading image
go to top