Indian Army Recruitment | भारतीय सैन्यात सेवा देण्याची पदवीधरांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army Recruitment

Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात सेवा देण्याची पदवीधरांना संधी

मुंबई : भारतीय लष्कराने एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. एकूण 55 पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून त्यापैकी 50 पदे पुरुष आणि 5 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे. (Indian Army Recruitment 2022, Join Indian Army)

हेही वाचा: भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू

रिक्त जागा तपशील

पुरुष - 50 पदे

महिला – ५ पदे

कोण अर्ज करू शकतो ?

या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकणाऱ्यांनाही अर्ज करण्याची परवानगी आहे. त्यांनी तीन/चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन/तीन वर्षांत किमान 50% एकूण गुण मिळवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: भारतीय सैन्यात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

वय मर्यादा

उमेदवाराची वयोमर्यादा 19 ते 25 वर्षे दरम्यान असावी.

निवड अशी होईल

उमेदवारांना त्यांच्या अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल आणि SSB साठी बोलावले जाईल. SSB 5 दिवस चालेल. SSB मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर यशस्वी उमेदवारांना जॉइनिंग लेटर दिले जातील.

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Web Title: Indian Army Recruitment Opportunity For Graduates To Serve In Indian Army

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..