नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आयटी क्षेत्रात मिळणार तब्बल दोन लाख नोकऱ्या; काय म्हणाले गोपालकृष्णन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infosys co founder kris gopalakrishnan

आर्थिक मंदीमुळं कंपन्या मोठ्या प्रमाणावर काम बंद करत आहेत.

नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आयटी क्षेत्रात मिळणार तब्बल दोन लाख नोकऱ्या; काय म्हणाले गोपालकृष्णन?

आर्थिक मंदीमुळं (Economic Downturn) कंपन्या मोठ्या प्रमाणावर काम बंद करत आहेत. मात्र, भारतीय आयटी क्षेत्र (Indian IT Sector) वेगळ्याच मुद्द्यावरुन चर्चेत आहे. भारतीय कंपन्यांमध्ये 'मूनलाइटिंग' ही एक मोठी समस्या बनलीय. त्यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गजांनी मूनलाइटिंगवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

असं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. मात्र, आता आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवलाय. बंगळुरू टेक समिटच्या कार्यक्रमात (Bengaluru Tech Summit) बोलताना गोपालकृष्णन म्हणाले, 'भारतीय आयटी उद्योग महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांदरम्यान आगामी काळात 2 लाख कर्मचारी नियुक्त करेल.'

हेही वाचा: नरेंद्र मोदी RSS चे स्वयंसेवक आहेत, पण..; पंतप्रधानांबाबत मोहन भागवतांचं मोठं विधान

गोपालकृष्णन पुढं म्हणाले, 'भारतीय आयटी उद्योग $220 बिलियन कमाईच्या आधारावर 8-10 टक्के दरानं वाढण्याची अपेक्षा आहे. AI/ML, Blockchain, Web 3.0, Metaverse सह तंत्रज्ञान क्षेत्र प्रगती करत आहे. त्यामुळं हा उद्योग वाढतच जाईल, असा माझा विश्वास आहे. लेऑफ मार्केटमध्ये फारच अल्पकालीन चढउतार आहेत. मी भविष्याबद्दल खूप आशावादी आहे.'

हेही वाचा: Narendra Modi : सोशल मीडियावर PM मोदींचीच हवा; South Indian लूक होतोय ट्रेंड

म्हैसूर, मंगळुरू, बेळगांव आणि हुबळी इथं छोटी कार्यालये उघडून कंपन्या आव्हानांवर मात करत असल्यानं आयटी क्षेत्र सुरक्षितपणे वाढणार असल्याचंही इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले. त्यांनी भारतातील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) सारख्या खासगी उद्योजकांच्या अद्वितीय मॉडेलचं कौतुक केलं. वास्तविक, गेल्या काही महिन्यांत फेसबुक, मेटा, अॅमेझॉन सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.