शिक्षण चिंतन : भारताची गौरवशाली ज्ञान परंपरा

भारतीय ज्ञानपरंपरेतील गणित, विज्ञान, कला व तत्त्वचिंतनाचा जागतिक पाया; मॅकॉलेच्या धोरणानंतर दुर्लक्षित झालेल्या या बौद्धिक संपदेचे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून पुनर्मूल्यांकन
India's knowledge tradition extends far beyond spirituality, encompassing mathematics, science, medicine, architecture, and critical inquiry. The article highlights the need to reconnect modern education with India's rich intellectual heritage.

India's knowledge tradition extends far beyond spirituality, encompassing mathematics, science, medicine, architecture, and critical inquiry. The article highlights the need to reconnect modern education with India's rich intellectual heritage.

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणामुळे भारतीय समाजाला स्वतःच्या ज्ञान परंपरेपासून दूर नेण्याचा प्रयत्न झाला. लॉर्ड मॅकॉलेने भारतीय शिक्षणाला दुय्यम ठरवून पाश्चात्त्य शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यानंतर भारतात अशी शिक्षणव्यवस्था उभी राहिली की भारतीय विद्यार्थ्यांना स्वतःच्या इतिहासातील वैज्ञानिक, गणितीय, भाषिक आणि तांत्रिक योगदानाची माहितीच उपलब्ध झाली नाही. १८५०च्या सुमारास लॉर्ड माउंटबॅटन यांच्याच नव्हे, तर अनेक ब्रिटिश प्रशासकांच्या शिक्षण धोरणांतून भारतीयांना स्वतंत्रपणे विचार करणारे नागरिक नव्हे, तर प्रशासनासाठी आवश्यक कर्मचारी अथवा उद्योगांसाठी आवश्यक कामगार तयार करण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. परिणामी, भारताची ‘संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसनासाठी शिक्षण’ व ‘जगाचे रहस्य उलगडण्याची बौद्धिक परंपरा’ शिक्षणातून हळूहळू बाजूला पडली. शिवाय, आजही अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक संकल्पना आपण एकोणिसाव्या शतकातील पाश्चात्त्य परिभाषांमधूनच समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भारतीय विचारपद्धती अनेकदा ‘तत्त्वज्ञान’ म्हणून बाजूला पडते आणि तिच्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन समोर येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com