esakal | भारतीय नौदलात 'अधिकारी' होण्याची सुवर्ण संधी; 'या' दिवशी भरा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy Recruitment

सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी नौदलात भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध झालीय.

भारतीय नौदलात 'अधिकारी' होण्याची सुवर्ण संधी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Indian Navy Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी नौदलात भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध झालीय. भारतीय नौदलाने कार्यकारी, तांत्रिक आणि शिक्षण खात्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदासाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. नौदलाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबरपासून सुरू होईल. तर, 5 ऑक्टोबरपर्यंत नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आपण अर्ज करु शकता. दरम्यान, याच कालावधित नौदलाच्या SSC अधिकारी पदाची भरती जून 2022 च्या अभ्यासक्रमासाठी होत आहे. हा अभ्यासक्रम भारतीय नौदल अकादमी इझिमाला, केरळ येथे होणार आहे.

महत्वाच्या तारखा-

अर्ज भरण्यास प्रारंभ - 5 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जून 2021

नौदल भरती 2021 : रिक्त पदांची संख्या

कार्यकारी शाखा-

सामान्य सर्व्हिस हायड्रो कॅडर - 45 पदे

हवाई वाहतूक नियंत्रक - 04 पदे

निरीक्षक- 08 पदे

पायलट - 15 पदे

लॉजिस्टिक्स - 18 पदे

शिक्षण शाखा-

शिक्षण - 18 पदे

तांत्रिक शाखा

अभियांत्रिकी शाखा सामान्य सेवा - 27 पदे

विद्युत शाखा सामान्य सेवा - 34 पदे

नेव्हल आर्किटेक्ट - 12 पदे

हेही वाचा: आता वार्षिक परीक्षेसाठी 9 वी, 11 वीची 'प्रश्नपत्रिका' बोर्ड तयार करणार!

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कार्यकारी शाखा

सामान्य सेवा हायड्रो कॅडर - किमान 60% गुणांसह कोणत्याही विषयात BE/B.Tech आवश्यक.

एअर ट्रॅफिक कंट्रोलर / ऑब्झर्व्हर / पायलट - किमान 60% गुणांसह कोणत्याही विषयात BE किंवा B.Tech आवश्यक. शिवाय, 10 वी आणि 12 वीमध्ये इंग्रजी विषयात किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.

लॉजिस्टिक्स- कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी BE, B.Tech आणि MBA असणे गरजेचे आहे.

शिक्षण शाखा - M.Sc. गणित किंवा B.Sc. भौतिकशास्त्रासह ऑपरेशनल रिसर्चमध्ये पदवी आवश्यक आहे.

तांत्रिक शाखा -BE, B.Tech विषयांत किमान 60% गुण आवश्यक आहेत.

loading image
go to top