Pind Dan at Raigad : रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय? शिवभक्त संतापले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad Pind Dan
Pind Dan at Raigad : रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय? शिवभक्त संतापले!

Pind Dan at Raigad : रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय? शिवभक्त संतापले!

संभाजी ब्रिगेडकडून काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये रायगडावर पिंडदान विधी सुरू असल्याचं दिसत होतं. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र आता पिंडदानामध्ये गैर काय असा सवाल काही हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्तांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Pind Daan At Raigad Fort : पिंडदानप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र

रायगडावर राम धुरी आणि त्यांचे काही सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून हा विधी करतात. रायगडाच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मावळ्यांच्या स्मरणार्थ हा पिंडदान केलं जातं. पितृपक्षात घराघरात हा विधी केला जातो. हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडने घेतलेला आक्षेप दुर्दैवी आहे, असं मत शिवभक्तांकडून व्यक्त केलं जात आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी पिंडदानाची पार्श्वभूमी आणि हेतू जाणून घेतला असता तर हा गोंधळ झाला नसता, असं मतही शिवभक्तांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: रायगडावर पिंडदान

२४ सप्टेंबरला शाक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते गडावर आले होते. याच दिवशी शस्त्रादहीद पितृश्राद्ध होतं. त्यामुळे राम धुरी आणि त्यांचे सहकारी शस्त्राने जखमी झालेल्या योद्ध्यांच्या पिंडदानासाठी गडावर दाखल झाले होते. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हे पाहिलं आणि त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

हेही वाचा: Raigad Fort : रायगडावरील शिवसमाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम? घटनेचा Video Viral

रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना याविषयी पत्र लिहिलं होतं. असे प्रकार टाळण्याचीही विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुढे येत हा आपल्या हिंदू संस्कृतीचा भाग असून त्यामागची भावना समजून घेण्याची विनंती केली आहे.