Scholarship Interim Answer Key : पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Scholarship Interim Answer Key
Scholarship Interim Answer KeySakal

Pune News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतरिम उत्तरसूचीवर १३ मार्चपर्यंत त्रुटी आणि आक्षेपाबाबत ऑनलाइन निवेदन करता येणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात १८ फेब्रुवारी रोजी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची परिषदेने जाहीर केली आहे. या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास पालकांना संकेतस्थळावर आणि शाळांना त्यांच्या लॉगिनमध्ये निवेदन करता येणार आहे.

ऑनलाइनशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी किंवा आक्षेपाबाबत निवेदनांचा विचार केला जाणार आहे. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेण्यात येतील आणि अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीच्या अर्जातील माहितीत विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग अशा दुरुस्ती करण्यासाठीही १३ मार्चपर्यंत शाळांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. हे अर्जही ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत, असे ओक यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com