esakal | चंबळमधलं गुंडाराज संपवणाऱ्या IPS अधिकाऱ्याने केलं विकास दुबेच्या एन्काउंटरचं नेतृत्व
sakal

बोलून बातमी शोधा

ips amitabh who lead vikas dube encounter in kanpur

दोन दशकांपासून उत्तर प्रदेशातील सर्वसामान्यांना विकास त्रास देत होता. त्याला शोधण्यापासून ते उत्तर प्रदेशात परत आणण्यापर्यंत आणि एन्काउंटरपर्यंत आयपीएस अमिताभ यश यांनी नेतृत्व केलं. 

चंबळमधलं गुंडाराज संपवणाऱ्या IPS अधिकाऱ्याने केलं विकास दुबेच्या एन्काउंटरचं नेतृत्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - गेल्या आठवड्याभरात उत्तर प्रदेशातील गँगस्टर विकास दुबे चर्चेत होता. कानपूरमध्ये पोलिसांच्या हत्याकांडानंतर त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. शेवटी मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये तो सापडला. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेशात नेत असतानाच एन्काउंटरमध्ये विकास दुबे मारला गेला. दोन दशकांपासून उत्तर प्रदेशातील सर्वसामान्यांना विकास त्रास देत होता. त्याला शोधण्यापासून ते उत्तर प्रदेशात परत आणण्यापर्यंत आणि एन्काउंटरपर्यंत आयपीएस अमिताभ यश यांनी नेतृत्व केलं. 1996 च्या बॅचचे आय़पीएस अधिकारी असलेले अमिताभ 4 सप्टेंबर 1996 रोजी नियुक्त झाले. त्यानतंर धडाकेबाज कामगिरीसाठी ते ओळखले जात आहेत. 

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात राहणाऱ्या अमिताभ यांनी पटना आणि दिल्ली इथं शिक्षण घेतलं. दिल्लीत केमिस्ट्री विषय घेऊन बीएससी केली. त्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये केमेस्ट्रीचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलं. यासोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला आणि 1996 मध्ये आयपीएस झाले. 

हे वाचा - पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...'

विकास दुबे जेव्हा चंबळ खोऱ्यात लपल्याची माहिती मिळाली तेव्हा अमिताभ यांच्याकडे त्याला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी चंबळमध्ये आधी काम केलं होतं. दहशतवादी ददुआ उर्फ शिव कुमारने चंबळच्या खोऱ्यात दहशत निर्माण केली होती. इतकी की त्या भागात कोणाला निवडणूक लढवायची असेल तर ददुआला पैसे द्यावे लागायचे. पैसे न देणाऱ्याला ठार केलं जायचं. अशा ददुआला 2007 ला एसटीएफमध्ये असताना अमिताभ यांनी ठार केलं. यासाठी त्यांनी पान टपरीवाल्यांनाही अमिताभ यांनी खबर मिळावी यासाठी मोबाईल दिले होते. 

विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेले अमिताभ त्यांच्या सहकाऱ्यांना सहज विश्वासात घेतात. त्यांना नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांची कार्यशैली अशी आहे की एन्काउंटरसारख्या घटना गुप्तच राहतात. त्यांच्या पथकाशिवाय इतर कोणाला त्याची माहिती मिळत नाही. एन्काउंटर झाल्यानंतरच गुन्हेगार ठार झाल्याचं समजतं. एसटीएफचे आयजी म्हणून काम करताना त्यांनी अनेक नामचीन गुंडांना पकडलं आहे. उत्तर प्रदेशात अनेक दहशतवादी अमिताभ यांना घाबरतात. अमिताभ यांचे वडीलही पोलिस अधिकारी होते. 

हे वाचा - वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी

विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर एसटीएफ पथकाची चर्चा सुरू आहे. 1998 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसात टास्क फोर्स तयार करण्यात आली. या पथकाचा उद्देश माफियांची माहिती काढणे आणि त्यांच्यावर कारवाई करणं हा आहे. दरोडेखोरांची भीती नष्ट करण्याचं कामही हे पथक करतं. प्रकाश शुक्ला नावाच्या गुंडाला पकडण्यासाठी या पथकाची स्थापना केली होती असंही सांगितलं जातं. उत्तर प्रदेशच्या सरकारची डोकेदुखी प्रकाश शुक्लाने वाढवली होती.