esakal | पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...'
sakal

बोलून बातमी शोधा

ias veer pratap singh raghav

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही लहान भावाचं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी मोठ्या भावाने नोकरी सुरू केली. त्यालाही आयएएस व्हायचं होतं मात्र लहान भावाच्या शिक्षणासाठी आपल्या मनाला आवर घातला. 

पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...'

sakal_logo
By
सूरज यादव

लखनऊ - अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचं रडगाणं न गाता शिक्षणाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेतलेल्या लोकांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणा देत असते. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर इथल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचीही कहाणी अशीच आहे. वीर प्रताप सिंग राघव असं त्याचं नाव. लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणासाठी धडपड सुरु होती. युपीएससीच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते तेव्हा दुसऱ्यांकडून उधार घेऊन परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवलं. विश्वासाच्या जोरावर हा संकल्प पूर्ण करत आयएएस झाला. 

युपीएससीची परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या वीर प्रतापने 92 वी रँक मिळवली होती. आयएएस झाल्यानंतर वीर प्रतापने सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट लिहिली होती. त्यात आपल्या इथपर्यंतच्या संघर्षाची कहाणी मांडली होती. अनेक अडचणी समोर येत होत्या. त्यांचा सामना करताना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळत होती. अनेकदा अभ्यासासाठी पुरेशी साधन सामग्री मिळायची नाही. मात्र त्यातही मार्ग काढून पुढे वाटचाल केली.

हे वाचा - वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी

बुलंदशहरमधील दलपतपूर गावात राहणाऱ्या वीर प्रतापचे वडील शेतकरी आहेत. घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असायची. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न वडिलांसमोर असायचा. त्यात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे बाजुला काढावे लागत होते. जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके, परीक्षेची फी यांचा खर्चही वाढला. तेव्हा व्याजाने पैसे घेतले. तीन टक्के महिना व्याजदराने पैसे घेऊन मुलाला आयएएस परीक्षेच्या तयारीसाठी पाठवलं होतं. वीर प्रतापने वडिलांच्या या कष्टाचं चीज केलं. 

वीर प्रतापने 2016 आणि 2017 मध्ये परीक्षा दिली होती. मात्र त्यामध्ये त्याला यश मिळालं नव्हतं. तेव्हा अपयशाने खचून न जाता पुन्हा अभ्यास सुरु केला. एकीकडे अभ्यास आणि दुसरीक़डे त्यासाठी घेतलेल्या कर्जाचं व्याज वाढत चाललं होतं. मात्र एकदिवस आपण नक्की यशस्वी होऊ हा विश्वास त्यांना होता. 

हे वाचा - अपयश आल्यावर वडील म्हणाले,'फक्त शेत विकलंय अजून किडनी आहे'; मुलगा दुसऱ्याच प्रयत्नात झाला IPS

वीर प्रतापने अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून 2015 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र आयएएसचा अभ्यास करताना पर्यायी विषय दर्शनशास्त्र निवडला होता. त्याच्या अभ्यासाच्या विषायापेक्षा वेगळा विषय निवडल्यानं त्याला पुन्हा जास्त मेहनत घ्यावी लागली. मुख्य परीक्षेच्या निकालात इंजिनिअरिंग झालेल्या राघवने दर्शनशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं. 

आणखी वाचा - बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही लहान भावाचं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी मोठ्या भावाने नोकरी सुरू केली. त्यालाही आयएएस व्हायचं होतं मात्र लहान भावाच्या शिक्षणासाठी आपल्या मनाला आवर घातला. त्यानंतर लहान भावाला शिकण्यासाठी आणि अभ्यासासाठी प्रेरणा दिली. आयएएस झाल्यानंतर वीर प्रतापने म्हटलं की, मी यशाच्या अनेक कथा वाचल्या आहेत. आज मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा मोठ मोठे अधिकारी हे उच्च वर्गातले असतात पण त्यात काही असेही असतात जे गावातले असतात. त्यांचं जीवन संघर्षाने भरलेलं असतं.