

ISRO Recruitment 2026: Apply for Technical & Driver Posts
esakal
ISRO Job Vacancy 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या यूआरएससी (URSC) केंद्राकडून टेक्निकल आणि ड्रायव्हर या विविध पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण ६१ जागांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in किंवा ursc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२६ आहे.