ITBP Recruitment 2022 | आयटीबीपीमध्ये ४० हेड कॉन्स्टेबल पदांवर भरती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ITBP Recruitment

ITBP Recruitment 2022 : आयटीबीपीमध्ये ४० हेड कॉन्स्टेबल पदांवर भरती सुरू

मुंबई : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ITBP ने हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटरनरी) पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या रिक्त पदांमधून एकूण ४० पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२२ आहे.

हेही वाचा: Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात सेवा देण्याची पदवीधरांना संधी

पदनाम

हेड कॉन्स्टेबल

एकूण पदांची संख्या - ४० पदे

पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेले असावे. नियमित पॅरा व्हेटर्नरी कोर्स किंवा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.

हेही वाचा: Army Recruitment : भारतीय सैन्यात नोकरीची संधी; मिळू शकतो १ लाख रुपये पगार

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी चाचणी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल.

अर्ज फक्त ऑनलाइन असेल

उमेदवारांचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. कोणताही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. ज्या उमेदवारांचे अर्ज योग्य आढळले त्यांना भरती परीक्षेत बसण्यासाठी प्रवेशपत्र दिले जातील.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.