ITBP recruitment : दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; ७० हजारांपर्यंत पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ITBP recruitme

ITBP recruitment : दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; ७० हजारापर्यंत पगार

मुंबई : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सने (ITBP) कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. या भरतीद्वारे एकूण १०८ रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर आहे.

हेही वाचा: Indian Army Recruitment : भारतीय सैन्यात सेवा देण्याची पदवीधरांना संधी

ITBP कॉन्स्टेबल रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - १०८

कॉन्स्टेबल (सुतार) – ५६ पदे

कॉन्स्टेबल (मेसन) – ३१ पदे

कॉन्स्टेबल (प्लंबर) – २१ पदे

पगार

निवडलेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये पगार मिळेल.

वय मर्यादा

या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय १७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

हेही वाचा: JanDhan : जनधन खातेधारकांना दरमहा मिळणार ३ हजार रुपये

शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

कॉन्स्टेबल पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना चार टप्प्यांतून जावे लागेल. फेज १ मध्ये, उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल, फेज २ मध्ये त्यांना लेखी चाचणी द्यावी लागेल, फेज ३ मध्ये त्यांना ट्रेड टेस्ट द्यावी लागेल आणि फेज ४ मध्ये त्यांना कागदपत्रं पडताळणी करावी लागेल. .

अर्ज फी

सर्वसामान्य श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज

१.- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर जा.

२.- त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये होमपेजवरील 'नवीन वापरकर्ता नोंदणी' या पोर्टलवर जा आणि नोंदणी करा.

३. - नोंदणी केल्यानंतर, क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि तुमच्या आवडीच्या पोस्टसाठी अर्ज करा.

४.- त्यानंतर तुमचा अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.

५.- फी भरल्यानंतर, अर्ज जतन करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट देखील घ्या.