esakal | ITI : पहिल्या फेरीत 90 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

ITI Admissions

ITI : पहिल्या फेरीत 90 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (ITI) अंतर्गत येणाऱ्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय मधील प्रवेशाची (ITI Admissions) पहिली गुणवत्ता यादी (First list) आज जाहीर करण्यात आली. यामध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 46 हजार 284 जागा पैकी केवळ 90 हजार 541 म्हणजेच 68.02 टक्के जागांवरच प्रवेश निश्चित (Admission confirm) झाले आहेत. तर उर्वरित 55 हजार 743 जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.

हेही वाचा: माहीम येथे प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल खुला; अपघात टाळण्यासाठी उभारणी

राज्यात एकूण 976 आयटीआय असून यामध्ये 417 शासकीय आणि 559 खाजगी व्यवस्थापनाच्या आयटीआय कार्यरत आहेत. या सर्व आयटीआय मध्ये 1 लाख 46 हजार 284 जागा उपलब्ध असून त्यासाठी यंदा प्रवेशासाठी 2 लाख 88 हजार 588 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 64 हजार 516 जणांचे अर्ज आयटीआयच्या प्रवेशासाठी पात्र ठरले होते त्यातील केवळ पहिला प्रवेश फेरीत 90 हजार 541 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित जागा रिक्त राहिल्या आहेत.

आयटीआयच्या पहिल्या प्रवेश फेरीत सर्वात कमी प्रवेश खाजगी आयटीआय मधून झाले असून त्यात केवळ 15 हजार 480 म्हणजेच 37.94 टक्के इतकेच प्रवेश निश्चित झाले आहेत. तर या तुलनेत सर्वाधिक प्रवेशित शासकीय आयटीआय मधून झाल्याचे या प्रवेश फेरीतून समोर आले आहे. शासकीय आयटीआयमधून पहिल्या प्रवेश फेरीत 75 हजार 61 जणांचे प्रवेश निश्चित झाले असून ही टक्केवारी 81.31 टक्के इतकी आहे.

loading image
go to top