

Japan OIST Paid Research Internship for Indian Students 2027
esakal
OIST Research Internship 2027: परदेशातील आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महागडे शिक्षण, प्रवास खर्च किंवा परदेशी भाषेची अडचण यापुढे आड येणार नाही, कारण जपानच्या दक्षिणेकडील ओकिनावा (Okinawa) बेटावरील Okinawa Institute of Science and Technology (OIST) या संस्थेने रिसर्च इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज मागवले आहेत.
अंडरग्रेजुएट आणि मास्टर्स शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पूर्णपणे निधीप्राप्त (Fully Funded) उपक्रम आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 4 ते 6 महिन्यांपर्यंत जागतिक दर्जाच्या लॅबमध्ये संशोधन करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी जपानी भाषा येणे आवश्यक नाही.