Jobs : बॅंक ऑफ बडोदामध्ये B.Tech अन्‌ M.Tech पास तरुणांना नोकरीची संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंक ऑफ बडोदा
बॅंक ऑफ बडोदामध्ये B.Tech अन्‌ M.Tech पास तरुणांना नोकरीची संधी!

बॅंक ऑफ बडोदामध्ये B.Tech अन्‌ M.Tech पास तरुणांना नोकरीची संधी!

सोलापूर : जर तुम्ही B.Tech, B.E. आणि जर तुमच्याकडे M.Tech पदवी असेल तर तुम्हाला बॅंकेत नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. बॅंकेत नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बॅंक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) BOB) ने IT विशेषज्ञ अधिकारी, डेटा वैज्ञानिक आणि डेटा अभियंता पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत बॅंक ऑफ बडोदा एकूण 15 पदांची भरती करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून ती 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, कारण अनेक वेळा शेवटच्या क्षणी फॉर्म भरताना अडचणी येतात.

हेही वाचा: सावधान! हेडफोन-इयरफोनचा वापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवात : 16 नोव्हेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 6 डिसेंबर 2021

शैक्षणिक पात्रता

डेटा सायंटिस्टच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्समध्ये 60 टक्के गुणांसह B. Tech / B.E. / M. Tech / M.E उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. याशिवाय डेटा अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी या विषयात पदवीधर असणे आवश्‍यक आहे. तसेच, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की क्‍लाउडेरा प्रमाणित प्रशासक क्रेडेन्शियल असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा: NITI आयोगामध्ये विविध पदांची भरती! 30 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी, की ते 6 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घेऊ शकतात. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट @bankofbaroda.in ला भेट देऊ शकतात.

loading image
go to top