सावधान! हेडफोन-इयरफोनचा वापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या | Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! हेडफोन-इयरफोनचा वापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या
सावधान! हेडफोन-इयरफोनचा वापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या

सावधान! हेडफोन-इयरफोनचा वापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या

सोलापूर : तुम्ही लॅपटॉप (Laptop), कॉम्प्युटर (Computer) किंवा मोबाईल (Mobile Phone) फोनवरून म्युझिक (Music) ऐकताना किंवा चित्रपट पाहताना हेडफोन (Headphone)- इयरफोन (Earphone) वापरत असाल व व्हॉल्यूम वाढवून आनंद घेत असाल तर वेळीच सावध व्हा! ही तुमची सवय तुमच्या कानासाठी धोकादायक ठरू शकते. आजकाल स्मार्टफोन वापरणारे सर्रास हेडफोन- इयरफोनचा उपयोग करतात. शक्‍यतो गरजेपुरता व मर्यादित डेसिबलमध्ये आवाज असणे योग्य असते. गरजेपेक्षा अधिक विशेषतः मनोरंजनासाठी मोठ्या आवाजात हेडफोन किंवा इयरफोनद्वारे गाणे किंवा संवाद ऐकणे चुकीचे ठरते. कानाच्या आरोग्यासाठी नियमित तपासणीदेखील महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे डॉल्बी व फटाक्‍यांचा आवाज अतिशय धोकादायक आहे. या आवाजाने कानाच्या पडद्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे या आवाजांपासून दूर राहणे किंवा टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

हेही वाचा: स्मार्टफोन कॅमेराद्वारे हेरगिरी; खासगी व्हिडिओ होताहेत रेकॉर्ड

अनेकवेळा कारखान्यांमध्ये मोठा आवाज करणाऱ्या यंत्रासोबत काम करावे लागते. त्याला इंडस्ट्रियल नॉईज असे म्हटले जाते. त्यावेळी देखील कामाचे तास संपल्यानंतर तेथे न थांबता या आवाजापासून दूर गेले पाहिजे. अन्यथा, कानाची तात्पुरती किंवा कायमस्वरूपी हानी होण्याची शक्‍यता असते. अशा कामगारांनी वर्षातून एकदा कानांची तपासणी करायलाच हवी.

इयरफोन किंवा हेडफोनचा वापर

आजकाल मुले इअरफोन किंवा हेडफोन कानाला लावून मोठ्या प्रमाणात संगीत ऐकत असतात. मात्र तासन्‌तास संगीत मोठ्या आवाजात ऐकणे धोकादायक आहे. तसेच फुल्ल व्हॉल्यूममध्ये संगीत ऐकणे त्रासदायक ठरू शकते. या प्रकारचा आवाज 90 डेसिबलपर्यंत असेल तर ते धोकादायक आहे. अद्याप हेडफोनच्या अतिवापराच्या दुष्परिणामांवर ठोस संशोधन झालेले नाही, तरीही डेसिबलची मर्यादा अधिक असू नये, हा नियम लागू होतो.

वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन शिक्षण

कोविड काळात संगणकावर काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत वर्क फ्रॉम होमही केले जात आहे. त्यासाठी हेडफोन किंवा इयरफोन वापरावा लागतो. अनेकांना त्यामुळे काम संपल्यावरदेखील हेडफोन वापरण्याची सवय लागते. तसेच मनोरंजनात संगीत ऐकण्यासाठी हेडफोन वापरला जातो. या स्थितीत केवळ कामाच्या गरजेपुरता हेडफोन वापरावा. नंतर सर्वसामान्यपणे हेडफोनशिवाय इतर कामे करावीत. तसेच स्पीकर ऑन करून अभ्यास एकाग्रतेने होत असेल तर ते योग्यच आहे. साधारणपणे अनेक तास हेडफोन लावल्याने नंतर चिडचिड होणे, मन एकाग्र न होणे या प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

ठळक बाबी...

  • हेडफोन किंवा इयरफोनचा वापर मर्यादित असावा

  • खूप मोठ्या आवाजात संगीत ऐकणे धोकादायक

  • वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन शिक्षणात 5 ते 7 तासच हेडफोन वापरावा

  • इंडस्ट्रियल नॉईजचा त्रास असणाऱ्यांनी वर्षातून एकदा कानाची तपासणी करावी

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

सर्वसाधारणपणे वर्क फ्रॉम होम व ऑनलाइन शिक्षणामुळे हेडफोन किंवा इयरफोनचा वापर वाढला आहे. परंतु, तो गरजेपुरताच असावा. तसेच त्यावरील व्हॉल्यूमदेखील मर्यादित असावा. कान हा अवयव कायम स्वयंचलित पद्धतीने सुस्थितीत असणारा अवयव आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ डॉक्‍टरांना दाखवायला हवे.

- डॉ. प्रसाद केळकर, कान-नाक-घसा तज्ज्ञ, सोलापूर

Web Title: Using Loud Headphones Earphones Can Be Dangerous

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyleviralupdate
go to top