esakal | दहावी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी; DRDO मध्ये 79 जागांसाठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

DRDO

दहावी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी; DRDO मध्ये 79 जागांसाठी भरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : DRDO Apprentice Recruitment 2021 : दहावी उत्तीर्ण अथवा आयटीआय (ITI) विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमध्ये (DRDO) अॅप्रेंटीस (DRDO Jobs 2021) करण्याची चांगली संधी आहे. यासाठी डीआरडीओने अनेक पदांची भरती नुकतीच काढली आहे. यात इच्छुकांनी फिटर, मशीनिस्ट, टर्नर, कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, वेल्डर अशा विविध अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज करू शकतात.

डीआरडीओ अ‍ॅप्रेंटिस भरतीद्वारे विविध व्यवसायांतील एकूण 79 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहितीसाठी पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर drdo.gov.in भरती अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

DRDO मधील रिक्त जागा..

फिटर - 14

मशीन - 06

टर्नर - 04

कारपेंटर - 03

इलेक्ट्रीशियन - 10

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 09

मेकॅनिक (मोटार वाहन) - 03

वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) - 07

संगणक, हार्डवेअर मेकॅनिक - 02

संगणक ऑपरेटर - 05

डिजिटल फोटोग्राफर - 06

सचिवालय सहाय्यक - 08

स्टेनोग्राफर (हिंदी) - 01

स्टेनोग्राफर (इंग्रजी) - 01

यूपीएससीच्या EPFO परीक्षेसाठी Admit Card जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

शैक्षणिक पात्रता

संबंधित सर्व ट्रेडमध्ये दहावी पास आणि आयटीआय प्रमाणपत्र असलेले असे सर्व उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत प्रशिक्षणार्थींचे वय 14 वर्षांपेक्षा कमी नसावे. पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.

निवड प्रक्रिया

टीबीआरएलचे मंडळ उमेदवारांच्या अर्जांची तपासणी करुन दहावी आणि आयटीआय परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे निवड करतील.

असा असेल पगार

फिटर, मशीनिस्ट, टर्नर, कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, वेल्डर - 8050 रुपये

डिजिटल फोटोग्राफर, स्टेनोग्राफर, सेक्रेटरियल असिस्टंट, कॉम्प्यूटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, कॉम्प्यूटर अँड हार्डवेअर मेकॅनिक -7700 रुपये.

अर्ज कसा करावा माहितीय?

इच्छुक उमेदवार NAPS पोर्टलवर apprenticeshipindia.org कागदपत्रांसह अर्ज सादर करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना 10 वी, आयटीआय प्रमाणपत्र, मार्कशीट, जात प्रमाणपत्र, आयडी प्रूफ इत्यादी कागदपत्रांची पीडीएफ तयार करावी लागेल आणि 17 मेपर्यंत ते admintbrl@tbrl.drdo.in वर पाठवावे लागेल.