esakal | विमा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

विमा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सरकारी नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

सरकारी किंवा खासगी विमा कंपन्यांमध्ये कार्यरत व्यावसायिकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.

विमा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सरकारी नोकरीची संधी!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सरकारी किंवा खासगी विमा कंपन्यांमध्ये (Insurance companies) कार्यरत व्यावसायिकांसाठी सरकारी नोकरीची (Government job) मोठी संधी आहे. विमा लोकपाल परिषदेने (Council for Insurance Ombudsmen -CIO) जीवन / सामान्य विमामध्ये विशेषज्ञ म्हणून भरती प्रक्रिया राबवत असून, त्यासंबंधी जाहिरातही जारी केली आहे. सरकारी किंवा खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे व्यावसायिक किंवा सेवानिवृत्त झाले आहेत किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात. कॉन्ट्रॅक्‍ट आधारावर तज्ज्ञांच्या पदांसाठी देशभरातील 17 कार्यालयांमध्ये एकूण 49 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. कराराचा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षे असेल, जो उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे दरवर्षी नूतनीकरण केला जाईल.

हेही वाचा: तुम्ही एमबीए करणार आहात? तर अशी करा 'एमबीए सीईटी'ची तयारी

असा करा अर्ज

विमा लोकपाल परिषदेच्या तज्ज्ञांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार भरती जाहिरात आणि अर्जाचा फॉर्म cioins.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात. भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचल्यानंतर, अर्ज पूर्ण भरून आणि आवश्‍यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती ऍटॅच करून जाहिरातीत दिलेला ई-मेल आयडी, specialist.life@cioins.co.in (फॉर लाइफ) किंवा विशेषज्ञ ई-मेल specialist.general@cioins.co.in (फॉर नॉन लाइफ) वर पाठवावा. CIO ने ई-मेल पाठवण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2021 निश्‍चित केली आहे.

हेही वाचा: 'एमओएसबी' करणार 533 वैद्यकीय अधिकारी पदांची भरती!

जाणून घ्या पात्रता

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना सरकारी किंवा खासगी विमा कंपनीमध्ये जीवन विमा किंवा सामान्य विमा क्षेत्रात 10 वर्षांचा अनुभव असावा. सध्या कार्यरत किंवा नोंदणीकृत किंवा सेवानिवृत्त व्यावसायिक अर्ज करू शकतात. 17 सप्टेंबर 2021 या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आणि 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्रता आणि इतर तपशिलाविषयी अधिक माहितीसाठी भरती अधिसूचना पाहा.

loading image
go to top