Army Recruitment : भारतीय सैन्यात परीक्षेविना नोकरीची संधी; एकूण ४० जागा रिक्त

एकूण 40 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Army Recruitment
Army Recruitmentgoogle

मुंबई : भारतीय सैन्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 137) साठी अधिसूचना जारी केली आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 11, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये 9, इलेक्ट्रिकलमध्ये 3, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 6, मेकॅनिकलमध्ये 9 आणि इतर इंजिनीअरिंगमध्ये 2 जागा रिक्त आहेत.

एकूण 40 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

Army Recruitment
Army Teacher Recruitment : लष्करी शाळेत सरकारी शिक्षक होण्याची संधी

कोण अर्ज करू शकतो ?

भारतीय सैन्यात TGC च्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील उमेदवारही अर्ज करू शकतात.

वय मर्यादा

उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे असावे आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसाठी केवळ अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत.

Army Recruitment
Indian Army Agniveer Bharti : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

वय मर्यादा

अभियांत्रिकी पदवीमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल जे पाच दिवस चालेल. मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज शुल्क

आर्मी TGT 137 परीक्षा 2022-23 साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com