Army Teacher Recruitment | लष्करी शाळेत सरकारी शिक्षक होण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Army Teacher Recruitment

Army Teacher Recruitment : लष्करी शाळेत सरकारी शिक्षक होण्याची संधी

मुंबई : तुम्ही सरकारी नोकरी (government job) शोधत असाल आणि सरकारी शिक्षक व्हावे हे तुमचे स्वप्न असेल, तर आर्मी स्कूल तुमच्यासाठी एक खास संधी घेऊन आले आहे. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) ने पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि प्राथमिक शिक्षक या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. (Army Teacher Recruitment)

पदांची नावे

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

प्राथमिक शिक्षक (PRT)

महत्त्वाच्या तारखा

नोंदणी प्रक्रिया - २५ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२२

प्रवेशपत्र - २० ऑक्टोबर २०२२

परीक्षा - ५ आणि ६ नोव्हेंबर

निकाल प्रकाशन तारीख - २० नोव्हेंबर २०२२

पात्रता

पदव्युत्तर शिक्षक (PGT) साठी, उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवीधर असावा. तसेच त्याने ५०% गुणांसह बीएड केलेले असावे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), उमेदवार ५०% गुणांसह पदवीधर आणि B.Ed असावा.

प्राथमिक शिक्षकांसाठी (PRT), उमेदवार ५०% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे २ वर्षांचा D.El.Ed./B.El.Ed डिप्लोमा असावा. याशिवाय बीएड असलेलेही या पदासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा आणि अनुभव

फ्रेशर्स- कमाल वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनुभव आवश्यक नाही.

अनुभवी उमेदवार- उमेदवाराचे वय ५७ वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच, संबंधित श्रेणीतील मागील १० वर्षांतील किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.

निवड अशी होईल

उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाईल.

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट awesindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात.