esakal | नोकरीसाठी 'या' कंपनीत आजच अर्ज करा; महिन्याला मिळणार तब्बल 2,00,000 पर्यंत पगार

बोलून बातमी शोधा

Coal India Limited
नोकरीसाठी 'या' कंपनीत आजच अर्ज करा; महिन्याला मिळणार तब्बल 2,00,000 पर्यंत पगार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोल इंडिया लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीसंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिध्द झाली असून या भरती प्रक्रियेद्वारे वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत. अधिसूचनेनुसार, ही भरती प्रक्रिया वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी अशा विविध पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी अर्ज कोल इंडिया लिमिटेड अर्थात सीआयएल https://www.coalindia.in च्या अधिकृत वेबसाइटवर करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 आहे.

वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ आणि वैद्यकीय तज्ञांच्या 23 आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या 21 पदांसाठी भरती होईल. तसेच, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून पदवी, एमबीबीएस पदवी, जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन अथवा पलमोनरी मेडिसीन यांचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एमबीबीएस पदवी किंवा पीजी डिप्लोमा या मान्यता प्राप्त संस्थेचा अनुभव असावा.

सीए फाइनल, सीए इंटरमीडिएट परीक्षा ढकलली पुढे; अंतिम तारीख कोणत्याही क्षणी होणार जाहीर

अर्ज करणा-या उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे विहित पत्त्यावर (महाव्यवस्थापक, कार्यकारी स्थापना विभाग, डब्ल्यूसीएल दुसरा मजला, कोल इस्टेट, डब्ल्यूसीएल प्रमुख क्वार्टर सिव्हिल लाइन, नागपूर, महाराष्ट्र) यावरती पाठवा. मुलाखतीसाठी नामांकित केलेल्या सर्व उमेदवारांना वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, मुख्यालय, नागपूर (महाराष्ट्र) येथे जावे लागेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत निवडलेल्यांना 60,000 ते 2,00,000 रुपयांचा पगार मिळेल. अर्जदारांचे वय वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व वैद्यकीय तज्ञांसाठी 42 वर्षे व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदासाठी 35 वर्षे असावे.