esakal | JSW कंपनीचा राज्य शासनासोबत करार; अनेकांना रोजगार होणार उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

jsw

JSW कंपनीचा राज्य शासनासोबत करार; रोजगार होणार उपलब्ध

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून, मंगळवारी (ता. १४) नामांकित जेएसडब्ल्यू कंपनीने (jsw company) राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असे आश्‍वासन देण्यात आले.

जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम

करारानुसार जेएसडब्ल्यू कंपनी जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर (contract) स्वाक्षऱ्या झाल्या. उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन, जेएसडब्ल्यू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर!

इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेग वॅट क्षमतेचा प्रकल्प

इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेग वॅट क्षमतेचा हायड्रोपॉवर प्रकल्प सुरू होणार आहे. भावली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना रोजगार मिळणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यांत पाच हजार मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १,८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यात सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. मंगळवारी झालेल्या या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असे आश्‍वासन देण्यात आले.

हेही वाचा: लखमापूर : विवाहितेची आत्महत्या; हुंड्याच्या रक्कमेसाठी छळ

loading image
go to top