करिअर घडविताना : एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) प्रवेशासाठी सामाईक (कॉमन) प्रवेश परीक्षा.
Entrance Exam
Entrance Examsakal

- के. रवींद्र

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) प्रवेशासाठी सामाईक (कॉमन) प्रवेश परीक्षा एनआयटी आगरतळा, एमएन-एनआयटी अलाहाबाद, एमए-एनआयटी भोपाळ, एनआयटी जमशेदपूर, एनआयटी कुरुक्षेत्र, एनआयटी रायपूर, एनआयटीके सुरथकल, एनआयटी तिरुचिरापल्ली, एनआयटी वारंगल या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. प्रवेश हे फक्त ‘एनआयएमसीईटी’मध्ये मिळालेल्या रँक किंवा गुणांवर आधारित आहे.

परीक्षा : ‘एनआयटी’, ‘एमसीए’ सामायिक प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज साधारणतः मार्चमध्ये उपलब्ध होतात व जूनमध्ये परीक्षा घेतली जाते.

पात्रतेचे निकष

कोणत्याही शाखेतील किमान ३ वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये गणित किंवा सांख्यिकीपैकी एक विषय घेऊन उत्तीर्ण पदवीधर व किमान ६० टक्के किंवा ६.५ सीजीपीए (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी बाबतीत ५५ टक्के गुण किंवा १०-पॉइंट स्केलवर ६.० सीजीपीए) मिळवणारा भारतीय नागरिक असावा.

किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बी.ई/बी.टेक उत्तीर्ण झालेले उमेदवार ‘एनआयएमसीईटी’साठी पात्र आहेत.

तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

ज्या इच्छुकांनी मुक्त विद्यापीठांमधून तीन वर्षात बीएससी/बीएससी (ऑनर्स)/ बीसीए/बीआयटी पदवी घेतली आहे, तेदेखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांचा अभ्यासक्रम यूजीसी/एआयसीटीई आणि सरकारच्या दूरस्थ शिक्षण परिषदेने (डीईसी) मंजूर केलेला असावा.

परीक्षेचा पॅटर्न

एनआयएमसीईटी-२०२३ ही परीक्षा पद्धत ऑनलाइन घेतली जाईल. त्यामध्ये खालील विषयांचा समावेश असलेले १२० बहुपर्यायी प्रश्न असतील. एकाधिक निवडीचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील आणि इतर कोणत्याही भाषेत ते भाषांतरित केले जाणार नाहीत. प्रश्न आणि गुणांचे वितरण खालीलप्रमाणे आहे.

• बरोबर उत्तर दिलेल्या प्रत्येक प्रश्नाला पूर्ण गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के गुण वजा होतील.

आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी अर्जामध्ये वैयक्तिक व शैक्षणिक तपशील नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यापूर्वी अचूक तपशील भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • दहावी आणि बारावीची गुणपत्रिका

  • पदवी गुणपत्रिका/प्रमाणपत्र

  • जन्मतारीख प्रमाणपत्र

  • पत्त्याचा पुरावा

  • ओळख प्रमाणपत्र

  • प्राचार्य, विभाग प्रमुख किंवा संचालक यांच्याकडून अंतिम वर्षाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • जातप्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • पीडब्ल्यूडी श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • लेखक प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग क्रेडेन्शिअल्स

  • कामाचे अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्त्वाच्या लिंक्स

https://nimcet.admissions.nic.in/ आणि https://vidyarthimitra.org/news

(लेखक www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com