करिअर घडविताना : एमएएच-एलएलबी सीईटी

भारतीय राज्यघटनेचे रक्षक व लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे न्यायपालिका आहे. या न्यायपालिकेत जनतेला निष्पक्ष न्याय मिळवून द्यायचे काम वकील करतात.
exam
examsakal
Summary

भारतीय राज्यघटनेचे रक्षक व लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे न्यायपालिका आहे. या न्यायपालिकेत जनतेला निष्पक्ष न्याय मिळवून द्यायचे काम वकील करतात.

- के. रवींद्र

भारतीय राज्यघटनेचे रक्षक व लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे न्यायपालिका आहे. या न्यायपालिकेत जनतेला निष्पक्ष न्याय मिळवून द्यायचे काम वकील करतात. त्यासाठी कायद्याचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. वकीली हे मानाचे व प्रतिष्ठेचे क्षेत्र आहे. कायद्याचा अभ्यासाबरोबर व्यावहारिक ज्ञानही तितकेच आवश्यक आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विविध प्रकारचे वकील होऊ शकतात. त्यामध्ये गुन्हेगार वकील, पर्यावरण, कौटुंबिक, कॉर्पोरेट, दिवाणी, कर, सायबर, जनहित वकील इ. क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात काम करण्याची संधी आहे संधी उपलब्ध आहे.

बारावीनंतर वकिली क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विधी म्हणजेच LLB (बॅचलर ऑफ लॉ) ५ वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर ३ वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्याकरिता प्रवेश परीक्षा आहेत. ती म्हणजे अनुक्रमे एमएएच-एलएलबी सीईटी ५ वर्ष व ३ वर्ष ही परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत राबविली जाते.

परीक्षेची तारीख

  • महा-विधी ५ वर्ष सीईटी - २०/०४/२०२३

  • महा-विधी ३ वर्ष सीईटी -

  • ०२/०५/२०२३ व ०३/०५/२०२३

  • परीक्षा पद्धती - ऑनलाइन

  • परीक्षेचा कालावधी - १२० मिनिटे

  • भाषा - इंग्रजी आणि मराठी

  • गुणदान योजना - प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण मिळेल व निगेटिव्ह मार्किंग नाही.

५ वर्षे आणि ३ वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमांसाठी ‘एमएच-सीईटी’ कायदा पात्रता निकष खालीलप्रमाणे -

५ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी

  • पात्रता - उमेदवारांनी भारतातील किंवा भारताबाहेरील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

  • गुण - उमेदवारांनी सामान्य/EWS/OMSसाठी किमान ४५ टक्के, अनुसूचित जाती/जमातीसाठी ४० टक्के आणि SBC/ OBCसाठी एकूण ४२ टक्के.

  • बारावीची परीक्षा दिली आहे ते विद्यार्थीही प्रवेश परीक्षेसाठी पात्र आहेत.

३ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी

  • राष्ट्रीयत्व - परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

  • पात्रता - उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही अभ्यासक्रमात पदवी प्राप्त केलेली असावी.

  • गुण - उमेदवारांनी पात्रता परीक्षेत सामान्य/EWS/OMSसाठी किमान ४५ टक्के, SC/STसाठी ४० टक्के आणि SBC/OBCसाठी ४२ टक्के.

आवश्यक  कागदपत्रे  

१. दहावीची गुणपत्रिका 

२. बारावीची  गुणपत्रिका (असल्यास) 

३. पदवी गुणपत्रिका (३ वर्ष अभ्यासक्रमासाठी)

४. जन्मदाखला किंवा वयाचा पुरावा 

५. उमेदवाराच्या नावाने भारतीय राष्ट्रीयत्वाचे  प्रमाणपत्र. 

६. महाराष्ट्र अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र. 

७. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) 

८. जात/जमाती  वैधता प्रमाणपत्र. (लागू असल्यास) 

९. नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास) 

१०. पासपोर्ट  साईज आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेला फोटो इत्यादी

महत्त्वाच्या लिंक -

https://llb5cet2023.mahacet.org

https:// llb3cet2023.mahacet.org/

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com