करिअर घडविताना : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३

एमएचटी-सीईटीचा निकाल नुकताच लागला, त्यानंतर बहुप्रतीक्षित, इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रिया २४ जूनपासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत राबविली जात आहे.
Engineering admissions process
Engineering admissions processesakal

- के. रवींद्र

एमएचटी-सीईटीचा निकाल नुकताच लागला, त्यानंतर बहुप्रतीक्षित, इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रिया २४ जूनपासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत राबविली जात आहे. या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती घेऊया.

ही प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील सर्व शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ विभाग, १० विद्यापीठाअंतर्गत येणारी महाविद्यालये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (BATU), COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (ICT), मुंबई आणि विनाअनुदानित खासगी व्यावसायिक तांत्रिक शैक्षणिक संस्था यासर्वांसाठी राबविली जाते.

पात्रता

1) मान्यताप्राप्त संस्थेतून इ. दहावी व बारावीमध्ये फिजिक्स व मॅथेमॅटिक्स (अनिवार्य) व केमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायॉलॉजी किंवा टेक्निकल व्होकेशनल विषय किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्फर्मेटिक्स प्रॅक्टिसेस किंवा ॲग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स किंवा बिझनेस स्टडीज किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा आंत्रप्रेन्योरशिप विषयांसह सर्वसाधारण प्रवर्गाकरिता किमान ४५ व इतरांसाठी ४० टक्के गुण आवश्यक आहे.

2) किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा डी. व्होक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) बारावीनंतर एमएचटी-सीईटी किंवा जेईई मेन्समध्ये नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोअर आवश्यक आहे.

4) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी अधिवास असावा किंवा महाराष्ट्रात जन्मलेला असावा.

प्रवेशपद्धती

1) एमएचटी-सीईटी व जेईई मेन्स असे दोन्ही स्कोअर ग्राह्य धरले जातात, त्यामध्ये स्टेट लेवल व ऑल इंडिया कोटा असे संबोधले जाते. उदा. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथे प्रवेशसाठी एमएचटी-सीईटीच्या स्कोअर आधारे ८० टक्के तर जेईई मेन्सच्या स्कोअरवर २० टक्के जागा भरल्या जातात.

2) होम युनिव्हर्सिटी व आउटसाइड युनिव्हर्सिटी कोटा - विद्यार्थ्याने बारावी ज्या जिल्ह्यातून उत्तीर्ण केली आहे त्या विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘होम युनिव्हर्सिटी’ ग्राह्य धरली जाईल व यासाठी ७० टक्के आरक्षण आहे, इतर विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के आरक्षण आहे.

उदा. पुणे, नाशिक व नगरमधील विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये होम कोटा राहील व इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आउटसाइड युनिव्हर्सिटी कोटा लागू होईल. अधिक माहितीसाठी युनिव्हर्सिटी जूरिडिक्शन जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

3) ट्यूशन फी वेवर स्कीम - या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याची ट्यूशन फी माफ केली जाते आणि या योजनेचे लाभार्थी असे विद्यार्थी आहेत, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत व त्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करतेवेळी TFWS क्लिक करणे आवश्यक आहे. एकूण वर्ग तुकडीच्या ५ टक्के सीट TFWS साठी आरक्षित आहेत.

4) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के जागा आरक्षित आहे. खुल्या प्रवर्गातील पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

5) महिलांसाठी आरक्षण - प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण वर्ग तुकडीच्या ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.

6) नाव नोंदणी - २४ जून ते ३ जुलैपर्यंत सीईटी सेलच्या पोर्टलवर नाव नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, एकतर इ-स्क्रूटनिटी किंवा स्वत- प्रत्यक्षात ARC सेंटरवर जाऊन मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते.

7) गुणवत्ता यादी - कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना मेरीट नंबर मिळतो यामध्ये प्रवर्गानुसार, विद्यापीठानुसार, ऑल इंडिया मेरीट (जेईई मेन्सचे मार्क दिले असल्यास) इ सर्वांचा मिळून मेरीट नंबर येतो, यामध्ये आपल्या लक्षात येते की, आपल्या पुढे किती प्रवेशासाठी आहेत.

क्रमश -

महत्त्वाच्या लिंक : https://mhtcet२०२३.mahacet.org/

https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थिमित्र

www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com