करिअर घडविताना : ऑलिंपियाड्स भाग-२

मागील लेखात आपण सायन्स ऑलिंपियाड विषयी माहिती घेतली. या लेखात आपण मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड व तसेच वेगवेगळ्या विषयांतील ऑलिंपियाडची माहिती घेऊयात.
National Science Olympiads
National Science OlympiadsSakal

- के. रवींद्र

मागील लेखात आपण सायन्स ऑलिंपियाड विषयी माहिती घेतली. या लेखात आपण मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड व तसेच वेगवेगळ्या विषयांतील ऑलिंपियाडची माहिती घेऊयात. होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) या संस्थांद्वारे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र आणि कनिष्ठ विज्ञान या विषयातील ऑलिंपियाड कार्यक्रम राबविले जातात.

मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड तीन टप्प्यात घेतले जाते.

प्रथम टप्पा -

भारतीय गणित पात्रता ऑलिंपियाड (IOQM)

परीक्षा दिनांक - ३ सप्टेंबर २०२३

वेळ - सकाळी १० ते १

कालावधी - ३ तास

एकूण गुण : १००

निगेटिव्ह गुणांकन नाही

प्रश्नपत्रिका रचना - प्रत्येकी २ गुणांचे १० प्रश्न; प्रत्येकी ३ गुणांचे १० प्रश्न; प्रत्येकी ५ गुणांचे १० प्रश्न.

दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा -

रिजनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड (RMO)

परीक्षा दिनांक - २९ ऑक्टोबर २०२३

वेळ - दु. १ ते ४

कालावधी - ३ तास

प्रश्नांची संख्या - ६

प्रत्येक प्रश्नासाठी तपशीलवार पुरावा लिहिणे आवश्यक.

तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा -

इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड (INMO)

प्रश्नांची संख्या - ६

परीक्षा दिनांक - २१ जानेवारी २०२४

वेळ - दुपारी १२ ते ४.३०

कालावधी - ४.५ तास

प्रत्येक प्रश्नासाठी तपशीलवार पुरावा लिहिणे आवश्यक.

याव्यतिरिक्त विविध संस्थांमार्फत ऑलिंपियाड स्पर्धा राबविल्या जातात यामध्ये सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (SOF) ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिंपियाड राबविणारी संस्था आहे. या संस्थेद्वारे खालील स्पर्धा राबविल्या जातात.

  • राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाड (NSO)

  • राष्ट्रीय सायबर ऑलिंपियाड (NCO)

  • आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड (IMO)

  • आंतरराष्ट्रीय वाणिज्य ऑलिंपियाड (ICO)

  • आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिंपियाड (IEO)

  • आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान ऑलिंपियाड (IGKO)

  • सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (SOF) शैक्षणिक उत्कृष्टता शिष्यवृत्ती (AES) दिली जाते

बालिका शिष्यवृत्ती योजना

(SOF-GCSS) २०२३-२४.

SOF-GCSS चे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ३०० गरजू मुलींना त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून ५ हजार रुपये प्रत्येक वर्षासाठी त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते.

संरक्षण सेवा शैक्षणिक शिष्यवृत्ती

(SOF-DSAS)

संरक्षण सेवा/अंतर्गत सुरक्षा कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आर्थिक साहाय्य देण्याच्या हेतूने शैक्षणिकदृष्ट्या २६० हुशार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख पुरस्कार/शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र दिले जाते.

शैक्षणिक उत्कृष्टता शिष्यवृत्ती

(SOF AES).

SOF-AES चा उद्देश विद्यार्थ्यांमधील सर्वांगीण शैक्षणिक विकासाला चालना देणे हा आहे. विविध विषयांमध्ये ऑलिंपियाड परीक्षेत शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करणाऱ्या अशा हुशार विद्यार्थ्यांच्या कामगिरीची शिष्यवृत्ती ओळखली जाईल.

AES अंतर्गत, प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी, म्हणजे प्रत्येक राज्य/झोनमधून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडला जाईल व त्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाते. भारतातील शाळांमधून मिळालेल्या नामांकनांमधून मुलींची निवड केली जाईल.

अधिक माहितीसाठी -

  • https://olympiads.hbcse.tifr.res.in/mathematical-olympiad 2023-2024

  • https://sofworld.org/

  • https://vidyarthimitra.org/news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com