केंद्रीय विद्यालय मुरादाबादतर्फे शिक्षकांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू ! जाणून घ्या कुठल्या पदांची भरती, मुलाखतीची तारीख व अर्ज करण्याची पद्धत 

Teacher
Teacher

सोलापूर : केंद्रीय विद्यालय, मुरादाबाद (उत्तर प्रदेश) तर्फे वर्ष 2021-22 साठी कंत्राटी भरती पदे भरण्यात येणार आहेत. विविध विषयांचे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी), पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (पीजीटी) आणि प्राथमिक शिक्षक (प्रायमरी टीचर) (पीआरटी) यासह इतर अनेक पदांसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीला जाण्यापूर्वी जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती... 

केव्हीएस मुरादाबादने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, इच्छुक उमेदवार 9 आणि 10 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात. 

मुलाखतीला जाण्यापूर्वी पात्रता तपासा 
केंद्रीय विद्यालय, मुरादाबादने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी वॉक-इन-इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी विविध पदांसाठी पात्रतेचे निकष तपासले पाहिजेत. तसेच, उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा आणि तो वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत घ्यावा. उमेदवार केव्हीएस मुरादाबाद, no1moradabad.kvs.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज डाउनलोड करू शकतात. 

या पदांसाठी होतील मुलाखती 

  • पदव्युत्तर शिक्षक (पोस्ट ग्रॅज्युएट टीचर) (पीजीटी) : इंग्रजी, हिंदी, गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वाणिज्य, अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान 
  • ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी) - इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि संस्कृत 
  • प्राथमिक शिक्षक (प्रायमरी टीचर) (पीआरटी) 
  • संगणक शिक्षक - माध्यमिक, उच्च प्राथमिक, प्राथमिक 
  • संगीत आणि नृत्य शिक्षक 
  • कला शिक्षक 
  • क्रीडा प्रशिक्षक 
  • योग प्रशिक्षक 
  • डॉक्‍टर 
  • नर्स 
  • सल्लागार 

आपल्या क्षमता जाणून घ्या 

  • प्राथमिक शिक्षक (पीआरटी) : वरिष्ठ माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समकक्ष पात्रता आणि प्राथमिक शिक्षण / बीएड मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50 टक्के गुणांसह. सीटीईटी पात्रता 
  • टीजीटी : संबंधित विषयात किमान 50 टक्के गुणांसह पदवीधर पदवी, बीएड इष्ट व सीटीईटी उत्तीर्ण 
  • पीजीटी : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बीएड हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्रावीण्य 
  • संगणक शिक्षक : बीई / बीटेक (कॉम्प्युटर सायन्स) / बीसीए / एमसीए / एमएससी (कॉम्प्युटर सायन्स) / एमएससी (आयटी) / बीएससी कॉम्प्युटर सायन्स 
  • स्पोर्टस्‌ कोच : (खो-खो, हॅंडबॉल, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, टेनिस) बीपीईडीशी संबंधित खेळामधील स्पोर्टस्‌ कोचचा अनुभव 
  • स्टाफ नर्स : जीएनएम किंवा बीएस्सी नर्सिंग 

सर्व पदांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्षे निश्‍चित केली गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com