
या नियमांबद्दल नागरिकांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत आणि हे नियम खरंच फायदेशीर ठरू शकतात का? हेही माहित करून घेणार आहोत.
नागपूर : काही दिवसांपूर्वी भारत सरकारकडून आलेल्या प्रस्तावानुसार लेबर कोट्समध्ये आठवड्यातून ४ दिवस काम तर ३ दिवस सुटी असणारआहे. या प्रस्तावामुळे देशातील अनेक सरकारी नोकरीवर असलेले कर्मचारी खुश झाले आहेत. खुश होण्यासारखं कारणही आहे. या नियमांमुळे सोमवार ते गुरुवार काम आणि शुक्रवार ते रविवार आराम करता येणार आहे. इतकंच नव्हे तर आपल्या कुटुंबाला आठवड्यातून तब्बल ३ दिवस देण्याची संधी मिळू शकणार आहे. मात्र या वर्किंग पॉलिसीमुळे अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंच ही नियम फायदेशीर ठरतील का? सामान्य नागरिकांना याचा फायदा काय? किंवा कर्मचाऱ्यांच्या कामावर याचा काय परिणाम होईल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणूनच या नियमांबद्दल नागरिकांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत आणि हे नियम खरंच फायदेशीर ठरू शकतात का? हेही माहित करून घेणार आहोत.
काय आहे ही वर्किंग पॉलिसी?
कामगार आणि रोजगार मंत्रालयनं नुकत्याच जारी केलेल्या एका प्रस्तावानुसार कंपन्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवून त्यांना आठवड्यातून ४ दिवस काम तर ३ दिवस सुटी देऊ शकतात. मात्र यामध्ये पेड हॉलीडेस कमी होणार नाहीये पण कामाचे तास वाढवण्यात येणार आहेत. मात्र यावर अनेक जाणकार लोकांची निरनिराळी मतं आहेत.
हेही वाचा - अरे वाह! आता Play Storeच्या माध्यमातून दुसऱ्या फोनमध्ये पाठवा ॲप्स आणि फाईल्स; जाणून घ्या या...
या नियमांमुळे होऊ शकतो त्रास
एका एम्प्लॉयमेंट कन्सल्टन्टच्या म्हणण्यानुसार, हे नियम कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. अनेकांना १२ तास काम करणं सहज वाटू शकतं मात्र अनेक कर्मचाऱ्यांसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. कारण दिवसभरात १२ तास काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांकडे वेळच शिल्लक राहणार नाही. काहींच्या म्हणण्यानुसार १२ तास सलग काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवरही याचा परिणाम होऊ शकतो.
मानसिकदृष्ट्या थकवणारे नियम
अनेकांच्या म्हणण्यानुसार ४ दिवस १२ तास काम आणि ३ दिवस सुटी यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेक कर्मचारी ८ तास काम करून दमतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना १२ तास काम दिल्यामुळे त्यांना याचा त्रास होऊ शकतो. तसंच ते मानसिकदृष्टया अधिक थकू शकतात आणि जर तुम्हाला ३ दिवस सुटी मिळूनसुद्धा थकवा जाणवत असेल तर सुटीचा फायदा काय? असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येतोय.
१२ तास काम करून दिवसाचं नियोजन करता येईल का?
हा प्रश्न सर्वात मोठा आहे. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयातून घरी जाताना किंवा घरून कार्यालयात येताना २-३ तासांचा वेळ लागतो. अशातच जर कर्मचार्यांच्ग्या कामाचे तास १२ तास असतील तर त्यांना येणं-जाणं करण्यात किमान १६ तास लागतील. कर्मचारी २४ तासांपैकी १६ तास जर कामामध्ये असतील तर त्यांना इतर कामं करण्यास वेळ मिळणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे काम सांभाळून दिवसाचं नियोजन करणं चांगलंच कठीण होणार आहे.
संशोधनात काय म्हंटलंय?
२०१७ साली Annals of Internal Medicineच्या माध्यमातून तब्बल ८ हजार अशा लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं जे सतत १२-१३ तास काम करतात. मात्र या सर्वेक्षणादरम्यान काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. तसंच इतका वेळ एकाच ठिकाणी बसणं धोकादायक ठरू शकतं असंही या सर्वेक्षणात सांगण्यात आलं. अशा लोकांमध्ये मॉरटॅलीटी रेटही जास्त असतो.
हेही वाचा - सावधान! तुमच्या स्मार्टफोनवर कोणाची नजर तर नाही ना? असं ओळखा आणि ठेवा सुरक्षित
या देशांमध्ये आहेत ४ दिवस कामाचे नियम
पॅरिस, स्वीडन आणि फिनलँड या देशांमध्ये $ दिवस काम आणि ३ दिवस सुटी हे नियम आहेत. तसंच फ्रांस देशात आठवड्यातून ३५ तास काम करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. फिनलँडच्या प्रधानमंत्री सना मरीन यांनीही फिनलँडमध्ये दिवसातून ६ तास काम आणि ३ सुवास सुटी हा प्रस्ताव मांडला आहे.फिनलँडमध्ये प्रॉडक्टिव्हिटीही अधिक आहे. त्यामुळे कर्मचारीही खुश आहेत.
मात्र भारतामध्ये मांडण्यात आलेला प्रस्ताव काही कर्मचाऱ्यांना सुखावणारा जरी असला तरी अनेकांसाठी मात्र वाढलेले कामाचे तास ही डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे सरकारनं कामाचे तास वाढवण्याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे असंही जाणकारांचं म्हणणं आहे.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ