esakal | नोकरी हवीये? मग लक्ष द्या! बायोडाटामध्ये 'या' चुका कधीच करू नका

बोलून बातमी शोधा

म्हणूनच बायोडाटा कसा असावा? आणि बायोडाटामध्ये कुठल्या चुका कधीच करू नयेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.    }

म्हणूनच बायोडाटा कसा असावा? आणि बायोडाटामध्ये कुठल्या चुका कधीच करू नयेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.    

नोकरी हवीये? मग लक्ष द्या! बायोडाटामध्ये 'या' चुका कधीच करू नका
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : भारत देशात नोकऱ्या कमी आणि बेरोजगार जास्त अशी परिस्थिती निर्माण झालीये. आजकालच्या काळात एक नोकरी मिळवण्यासाठी शेकडो विद्यार्थी फॉर्म भरतात. मात्र यापैकी निवड मात्र फक्त एकाची होते. अनेकदा मुलाखत देऊन आल्यानंतरही नोकरी मिळत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे तुमचा बायोडाटा. तुमचा बायोडाटा हा तुमच्याआधी पुढील कंपनीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बायोडाटावर तुम्हाला नोकरी मिळणार की नाही हे अवलंबून असतं. म्हणूनच बायोडाटा कसा असावा? आणि बायोडाटामध्ये कुठल्या चुका कधीच करू नयेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.    

10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या...

पर्सनल इन्फॉर्मेशन थोडक्यात लिहा 

अनेकदा काही लोकं आपल्या बायोडाटामध्ये स्वतःची, आई-वडिलांची आणि संपूर्ण कुटुंबाची माहिती लिहितात. मात्र लक्षात ठेवा बायोडाटा तुमचा आहे. त्यामुळे बायोडाटामध्ये गरज नसलेली माहिती येऊ देऊ नका. नेहमी तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, प्रोफेशनल एक्सपेरिअन्स इत्यादी माहिती असायला हवी. यापेक्षा अधिक गरज नसलेली माहिती असल्यास तुमचा वाईट प्रभाव पडू शकतो.

चुका करू नका 

मुलाखतीला जाताना तुम्हालाच ही नोकरी मिळणार या आत्मविश्वासानं जा. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बायोडाटामधील एकूण एक शब्द वाचा. कुठेच चुकीचा शब्द वापरू नका किंवा स्पेलिंग मिस्टेक करू नका. जर तुमच्या बायोडाटामधील चूक लक्षात आली तर कदाचित तुम्हाला ती नोकरी मिळू शकणार नाही. म्हणूनच या बायोडाटा तयार करताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचा. तसंच तुमच्या शिक्षकांकडून किंवा एक्सपर्टकडून बायोडाटा एकदा तपासून घ्या.  

खोटं वागू नका 

मुलाखतीच्या दरम्यान आईंक जणांना आपल्यातील खऱ्या गुणांपेक्षा खोटे गुणसंगणयत अधिक रस असतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक जण स्वतःबद्दल खोटी माहिती देतात. मात्र लक्षात ठेवा या गोष्टी मुलाखत घेणाऱ्यांच्या लक्षात येतात. यामुळे तुमचा वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे नेहमी आपल्यातील खरे गुण बायोडाटामध्ये लिहा. तसंच तुमच्यातील कमतरताही लिहा. 

ई-मेल आयडी महत्त्वाचा 

तुमच्यातील आणि मुलाखत घेणारी व्यक्तीतील दुआ म्हणजे तुमचा ई-मेल आयडी. तुमच्यातील सर्व संभाषण किंवा वार्तालाभ हा ई-मेल आयडीच्या माध्यमातून होईल. त्यामुळे तुमचा ई-मेल आयडी नेहमी लहान आणि लक्षात राहील असा तयार करा. तसंच तुमच्या नावाशिवाय आणि अंकांशिवाय त्यात लिहू नका. 

10th & 12th Board Preparation: अभ्यास नक्की किती वेळ करावा? विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या या...

कमी शब्दांमध्ये अधिक माहिती 

कंपनीच्या HR कडे फक्त तुमचाच नाही तर असे शेकडो बायोडाटा येतात. त्यामधून त्यांना काही निवडावे लागतात. त्यामुळे जर तुमच्या बायोडाटामध्ये कमी शब्दांमध्ये अधिक माहिती लिहिली असेल तरच तो बायोडाटा निवडण्यात येईल. म्हणूनच गरज नसलेली माहिती बायोडाटामध्ये लिहू नका. अगदी थोडक्यात तुमच्याबद्दल भरपूर सांगणारा बायोडाटा तयार करा. यासाठी कधीच २ पानांपेक्षा अधीक मोठा बायोडाटा बनवू नका.    

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ