esakal | केंद्रीय विद्यालयात Admission करायचं आहे?; 'या' दिवशी होणार 'लिस्ट' जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Kendriya Vidyalaya

केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya) दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, आता पहिलीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे.

केंद्रीय विद्यालयात Admission करायचं आहे?

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

KVS Notification 2021 : केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya) दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, आता पहिलीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालीय. परंतु, जर आपल्याला इतर कोणत्याही वर्गात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याची प्रक्रिया सुरु झाली असून याबाबत 24 जुलै रोजी यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपण आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज केला असेल, तर आपण यादीची तपासणी देखील करु शकता. केंद्रीय विद्यालयात विविध कोटे असून त्या अंतर्गत प्रवेश दिला जात आहे. मागील महिन्यापासून केंद्रीय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून त्याची सुरुवात एप्रिलमध्ये झाली होती. (KVS Notification 2021 Admission in 2nd And Other Class in Kendriya Vidyalaya List Will Come on 24 July)

इयत्ता पहिलीशिवाय इतर वर्गात प्रवेश घेण्यासाठी एससी / एसटी / ओबीसी / दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी वयाचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आणि श्रेणी प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे. तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील बंधनकारक असणार असून सैन्यदलातील संबंधित कुटुंबांसाठी सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: 'नवोदय' प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा

केंद्रीय विद्यालयात नव्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी 25% शिक्षण हक्कांतर्गत अनुसूचित जातीसाठी 15%, अनुसूचित जमातीसाठी 7.5 % आणि ओबीसीसाठी 27 % आरक्षित आहेत. 2021- 22 च्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया मार्च 2021 च्या चौथ्या आठवड्यात सुरू करण्यात आली आहे.

KVS Notification 2021 Admission in 2nd And Other Class in Kendriya Vidyalaya List Will Come on 24 July)

loading image