esakal | 'नवोदय' प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Navodaya Vidyalaya Committee

नवोदय विद्यालय समिती, एनव्हीएसने JNVST 2021 साठी 6 वीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय.

'नवोदय' प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Navodaya Exam Date 2021 : नवोदय विद्यालय समिती, एनव्हीएसने JNVST 2021 साठी 6 वीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणार असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात COVID-19 प्रोटोकॉलनुसार, प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एनव्हीएसने (Navodaya Vidyalaya Committee) स्पष्ट केलेय. यामध्ये एकूण 2,41,7009 उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 11,182 केंद्रांमध्ये 47,320 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (navodaya-vidyalaya-exam-date-2021-admission-in-class-6-jnv-selection-test-details-check-here)

याबाबत शिक्षण मंत्रालयाने एका ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र 2021-22 च्या वर्ग-8 मधील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. दरम्यान, ही परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. यापूर्वी ही परीक्षा 19 जुलै आणि त्यापूर्वी 16 मे 2021 रोजी घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती परीक्षेच्या किमान 15 दिवस आधी देण्यात येईल, असेही मंत्रालयाने ट्विटमध्ये स्पष्ट केलेय. इयत्ता 6 वीसाठी जेएनव्हीएसटी परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि प्रत्येक राज्यातील प्रादेशिक भाषेत घेतली जाते. परीक्षेचा कालावधी 2 तास असून त्यात मानसिक क्षमता, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी असे तीन विभाग करण्यात येतात. या प्रश्नपत्रिकात एकूण 100 गुणांसह 80 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील.

हेही वाचा: ITI मध्ये स्थानिकांना 90 टक्के प्रवेश

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध शाळांमध्ये 6 वी व 9 वीच्या प्रवेशासाठी नवोदय प्रवेश परीक्षा किंवा जेएनव्ही निवड चाचणी दरवर्षी घेतली जाते. 2021 च्या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असून या परीक्षेला प्रवेश परीक्षा म्हणूनही ओळखली जाते. दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. जेव्हीएन ही माध्यमिक शिक्षणासाठी केंद्रिय अर्थसहाय्यित शाळा आहे. ही निवासी शाळा असून गुणवंत विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण प्रदान करते. प्रवेश प्रक्रियेसाठी ही परीक्षा सहसा वर्षातून दोनदाच घेतली जाते. मात्र, यंदा विविध कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

navodaya-vidyalaya-exam-date-2021-admission-in-class-6-jnv-selection-test-details-check-here

loading image