महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांवर मोठी भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांवर भरती

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) (MSEDCL) नोकरी (Jobs) करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागासाठी प्रशिक्षणार्थींची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेत इलेक्‍ट्रिशियन (वीजतंत्री) (Electrician) व वायरमन (तारतंत्री) (Wireman) अशी 149 पदे भरली जाणार आहेत. इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईला भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी नोकरीसाठी अर्ज करावा.

हेही वाचा: PGVCL मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी बंपर भरती !

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती होत आहे. पहिली पोस्ट ही इलेक्‍ट्रिशियन (वीजतंत्री) साठी असून, यासाठी एकूण 94 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व ITI-NCVT (इलेक्‍ट्रिशिअन / वायरमन) कोर्स केलेला असावा.

दुसरी पोस्ट वायरमन (तारतंत्री) साठी असून, पदांसाठी एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार वायरमन पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व ITI-NCVT (इलेक्‍ट्रिशिअन/वायरमन) कोर्स पूर्ण केलेला असावा.

हेही वाचा: सोलापूर विद्यापीठाच्या 'PET'चा बुधवारी निकाल ! 5 सप्टेंबरला मेरिट यादी

वयाची अट

इलेक्‍ट्रिशियन (वीजतंत्री) व वायरमन (तारतंत्री) पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 30 वर्षांपर्यंत असावे. ही पदे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागासाठी भरली जाणार असून, इच्छुक पात्र उमेदवारांनी संबंधित पदांच्या जागांबाबत व पात्रता तसेच अटींबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील नोटिफिकेशन वाचून घ्यावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेबसाईट

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in ऑनलाइन र्ज सादर करावा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viraleducationjobsupdate
loading image
go to top